शहरं
Join us  
Trending Stories
1
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
2
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
3
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
4
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
5
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
6
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
7
सत्ता मिळविण्यासाठी उद्धवसेनेने प्रतिष्ठा घालविली; मुख्यमंत्री शिंदेंची घणाघाती टीका
8
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
9
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
10
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
11
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
12
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
13
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
14
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
15
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
16
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती
17
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
18
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
19
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
20
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक

बाबा रामदेव यांच्याविरोधात डॉक्टर्स 1 जूनला देशभर 'काळा दिवस' साजरा करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 3:37 PM

Doctors Black Day Against Ramdev: गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते.

ठळक मुद्देबाबा रामदेव यांनी 'जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी', असे  इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे.

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून अॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक उपचार पद्धतीवरून योग गुरु बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये (आयएमए) वाद सुरू आहे. निवासी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे की, अ‍ॅलोपॅथीविषयी बाबा रामदेव यांनी केलेल्या विधानाविरोधात 1 जून रोजी देशव्यापी निषेध करण्यात येणार असून हा काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. तसेच, याबाबत बाबा रामदेव यांनी 'जाहीरपणे बिनशर्त माफी मागावी', असे  इंडियन मेडिकल असोसिएशनने म्हटले आहे. (doctors hold a nationwide black day protest on 1st june against ramdev allopathy remarks)

गेल्या रविवारी बाबा रामदेव यांनी अलोपॅथी उपचारपद्धतीवर टीका करताना तिला 'स्टुपिड' (मूर्खपणा) व दिवाळखोर विज्ञान असे संबोधले होते. बाबा रामदेव यांनी 25 प्रश्नही अलोपॅथीला विचारले होते. रेमडेसिवीर, फॅबीफ्लू व अन्य औषधे घेऊनही कोविड रुग्णांचे मृत्यू अलोपॅथी रोखू शकली नाही, असे आरोप त्यांनी केले होते. बाबा रामदेव यांच्या अशा टीकेनंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत बाबा रामदेव यांनी आपली अलोपॅथीवरची टिप्पण्णी मागे घ्यावी असे त्यांना सुनावले होते. पण, बाबा रामदेव यांनी डॉक्टरांवर पुन्हा टीका केली होती.

बाबा रामदेव यांच्याविरोधात 1 हजार कोटींचा मानहानीचा दावाइंडियन मेडिकल असोसिएशनच्या उत्तराखंड राज्यातल्या शाखेने बाबा रामदेव यांच्याविरोधात अलोपॅथी व अलोपॅथी चिकित्सेवर अवमानकारक टीका केल्याप्रकरणी एक हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला आहे. या संदर्भातील एक नोटीस इंडियन मेडिकल असोसिएशनने बाबा रामदेव यांना धाडली आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनचे उत्तराखंड शाखेचे सचिव अजय खन्ना यांनी 6 पानांची एक नोटीस बाबा रामदेव यांना पाठवली असून त्यात अलोपॅथीचे 2000 डॉक्टरांची प्रतिष्ठा व त्यांच्या प्रतिमेवर रामदेव बाबा यांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, इंडियन मेडिकल असोसिएशनने केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यांची योगगुरू बाबा रामदेव यांनी खिल्ली उडवली आहे. ज्यांना काही मान नाही, असे लोक एक हजार कोटी रुपयांच्या मानहानीचा दावा करत आहेत, अशा शब्दात बाबा रामदेव यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनवर निशाणा साधला आहे. 

इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केली तक्रार  अ‍ॅलोपॅथीच्या उपचारांवर वादग्रस्त भाष्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्या अडचणी वाढत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) सरचिटणीस डॉ. जयेश लेले यांनी बाबा रामदेव यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार दिल्लीतील आयपी इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. बाबा रामदेव लसीकरणाबाबत लोकांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्यावर देशद्रोहाअंतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी ‘आयएमए’कडून करण्यात आली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, बाबा रामदेव कोरोनावरील उपचारांबद्दल संभ्रम पसरवीत आहे, हा एक गुन्हा आहे. आयएमएकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिण्यात आले आहे. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाMedicalवैद्यकीयdoctorडॉक्टरIndiaभारत