शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! १२ देशांमध्ये हंता व्हायरस पसरण्याचा धोका; WHO ने जारी केला रेड अलर्ट, जगासमोर आव्हान
2
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
3
होर्मुझजवळ चीनच्या तेल टँकरवर मोठा हल्ला; अमेरिका-इराण युद्धात पहिल्यांदा असं घडलं, तणाव वाढला!
4
Nashik TCS Case: निदा खान कुठं अन् कुणासोबत होती? पोलिसांनी तिला कसं शोधलं? जाणून घ्या A टू Z माहिती
5
Robot World Record : माणसालाही हरवलं! रोबोटनं धावण्याच्या शर्यतीत मोडला जागतिक विक्रम; पाहा थरारक वेग
6
महाराष्ट्रातले साडेतीन पक्ष भाजपपुढे टिकाव धरतील?
7
आजचे राशीभविष्य, ०८ मे २०२६: मेष राशीला व्यवसायात लाभ, 'या' लोकांनी नकारात्मक विचारांपासून दूर राहावे!
8
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
9
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
10
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
11
JNPA Port : ‘जेएनपीए’ पुन्हा ‘हाऊसफुल्ल’; पाचही टर्मिनल्समध्ये लगबग; पश्चिम आशियातील युद्धाचे ढग सरले; २२ हजार कंटेनरची हाताळणी
12
रक्ताची ‘बंगाली’ चटक; हिंसाचाराच्या आगीत होरपळणारा बंगाल
13
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
14
लोणावळ्यात धक्कादायक घटना! जन्मदात्या पित्याकडून लेकीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल
15
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
16
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
17
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
18
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
19
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
20
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
Daily Top 2Weekly Top 5

Doctors Day : सात महिन्यांच्या गर्भवती, तरीही दररोज 60 किमीचा प्रवास करून बजावतायेत कोरोनाग्रस्तांची सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 15:51 IST

पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून ते कोरोनाविरूद्ध युद्ध करीत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या वर्दीचा रंग निळा आणि पांढरा आहे.घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत.

फाजिल्का : कोरोना ड्युटी करत असलेल्या डॉक्टर सुनीता कंबोज या लोकांनी घरीच थांबण्याचा आणि मास्क घालण्याचा सल्ला देतात. तसेच, सात महिन्यांच्या गर्भवती असूनही कोरोना रुग्णांच्या काळजीसाठी जलालाबाद ते फाजिल्का सिव्हिल हॉस्पिटल असा दररोज 60 किलोमीटर लांबीचा प्रवास करतात. 

डॉ. सुनीता कंबोज यांना घरी परत यायला रात्रीचे 12 सुद्धा वाजत होते, पण त्यांच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्त्वाचे होते. दरम्यान, त्यांच्या या सर्वोत्तम आरोग्य सेवासाठी त्यांना येत्या 15 ऑगस्ट रोजी पोलीस डीजीपी पुरस्कार देण्यात येणार आहे.

डॉ. सुनीता यांनी सांगितले की, "कोरोना कालावधीत सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे, कोरोना रुग्णांच्या प्रवासाचा इतिहास पाहून त्यांना क्वारंटाईन करणे, नमुने घेणे, फील्ड वर्क, राज्य समन्वय साधणे आहे. विशेष म्हणजे, कोरोना रुग्णाची चांगली काळजी घेण्यात सक्षम झाल्याने मला देखील आनंद होतो."

पृथ्वीवर देवाचे रूप. म्हणजेच, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी. तीन महिन्यांपासून ते कोरोनाविरूद्ध युद्ध करीत आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यांच्या वर्दीचा रंग निळा आणि पांढरा आहे. न थांबता सतत कर्तव्य बजावणे. घरगुती आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांसोबतच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना सकारात्मक आणि निरोगी ठेवण्याचे काम करत आहेत. एकच ध्येय म्हणजे या साथीच्या रोगाचा पराभव करणे. 

सर्वप्रथम रूग्ण त्यानंतर कुटुंब, असे लुधियानाचे डॉ. अनमोल रत्न आणि त्यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता यांनी सांगितले. सुरुवातीपासूनच सिव्हिल हॉस्पिटलचे ईएनटी स्पेशालिस्ट डॉ. अनमोल रत्न आयसोलेशन वॉर्डमध्ये तैनात आहेत. ते दररोज कोरोना रुग्णांचे नमुने घेतात. 4 वर्षांच्या मुलाला भेटू शकत नाही. लोकांचे सहकार्य आपल्याला पुढे काम करण्याचे धैर्य देते आणि कुंटुब पाठिंबा देते, असे डॉ. अनमोल रत्न सांगतात.

याचबरोबर, डॉ. अनमोल रत्न यांची पत्नी डॉ. मीनल गुप्ता या डीएमसीमध्ये माइक्रोबायोलॉजिस्ट आहेत. कोरोना रुग्णांचे नमुने तपासण्यात मोठे योगदान देत आहेत. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी (दि.30) 5 लाख 66 हजार 840 झाली आहे. तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असून, आता ते राज्य दिल्लीपेक्षा पुढे गेले आहे.

महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आता तामिळनाडूमध्ये आहेत. देशात 24 तासांमध्ये 418 रुग्ण मरण पावले असून, कोरोनाच्या बळींची संख्या त्यामुळे 16 हजार 893 वर गेली आहे.
 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टर