शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासनांचे तुकडे फेकून निवडणुका जिंकत नाही !

By admin | Updated: August 31, 2016 04:20 IST

आश्वासने लटकत ठेवून व काही तुकडे फेकून निवडणुका जिंकता येतील परंतु देश चालवता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले

सनोसरा (गुजरात) : आश्वासने लटकत ठेवून व काही तुकडे फेकून निवडणुका जिंकता येतील परंतु देश चालवता येणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. त्यांच्या हस्ते मंगळवारी सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन (सौनी) प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद््घाटन झाले. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांची ही येथील पहिलीच भेट होती. मोदी यांनी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. गुजरातमध्ये निवडणुका होणार असल्यामुळे मोदी यांच्या या भेटीवर काँग्रेसने टीका केली होती. सौनी प्रकल्प हा गुजरात सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असून दुष्काळाला दर तीन वर्षांनी तोंड देत असलेल्या सौराष्ट्रातील ११५ धरणे सरदार सरोवर धरणातील अतिरिक्त पाण्याने भरण्याची योजना आहे. त्यासाठी कालवे आणि पाईपलाईनचा वापर केला जाईल. ५७ किलोमीटरची पाईपलाईन करून झाल्यानंतर या पहिल्या टप्प्याचे उद्््घाटन झाले.मोदी यांच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण दूरदर्शनचा कॅमेरामन संतोष शेजकर धरणाच्या पाण्यात उभा राहून करीत होता. मोदी यांच्या उपस्थितीत त्या वेळी धरणातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह इतका वाढला की ते पाहणाऱ्या मोदी यांना धोका जाणवला. त्यांनी लगेच मुख्यमंत्री विजय रूपानी यांना सांगून कॅमेरामनला तिथून दूर जाण्यास भाग पाडले. कॅमेरामन नदीतून बोहर येताच, पाण्याचा प्रचंड लोंढा त्याच्या कॅमेऱ्यावर आदळला आणि कॅमेरा दिसेनासा झाला. पण मोदी यांच्या समयसूचकतेमुळे संतोष शेजकर याचा मात्र जीव वाचला. भाषणादरम्यान घोषणाबाजीमोदी यांचे भाषण सुरू असताना पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या (पास) सदस्यांना त्यांनी घोषणा दिल्याबद्दल पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय जवळपासच्या भागातून ‘पास’च्या सुमारे २५ जणांनाही ताब्यात घेण्यात आले. सौनी पाटबंधारे प्रकल्पाचे उद््घाटन झाल्यानंतर मोदी भाषण करीत असताना पटेल संघटनेशी संबंधित तीन युवकांनी ‘जय सरदार, जय पाटीदार’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी त्यांना तेथून दूर नेले.