शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला गृहित धरू नका, पाय जमिनीवर ठेवा - उद्धव ठाकरे

By admin | Updated: September 17, 2014 18:42 IST

नऊ राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपाची झालेली पिछेहाट महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - नऊ राज्यातील पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका असा सल्ला उद्धव ठाकरेंनी भाजपला दिला आहे. लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवलेल्या भाजपाला आधी बिहार व त्यानंतर उत्तर प्रदेश, राजस्थान येथील पोटनिवडणुकांत पराभव पत्करावा लागला. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी 'सामना'च्या अग्रलेखातून भाजपाला पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. या निकालांपासून धडा घ्या, विजयाचा उन्माद चढू देऊ नका, जे हे ऐकतील तेच महाराष्ट्र काबीज करतील, असेही त्यांनी म्हटले आहे. 
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप- शिवसेनेत सध्या जागावाटपाचा तिढा सुरू आहे. लोकसभेतील यशानंतर भाजपला आता महाराष्ट्रात सत्ता स्थापनेची घाई असून त्यासाठीच ते निम्म्या जागांच्या मागणीसाठी आग्रही आहेत. मात्र लोकसभेत भाजपाला तर विधानसभेत शिवसेनेला अधिक जागा हे गेल्या अनेक वर्षांपासूनचे असलेले सूत्र शिवसेना बदलण्यास तयार नाही. यामुळे भाजप नेते नाराज असून गरज पडल्यास स्वबळावर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि गुजरातमधील पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजपाचा करिश्मा ओसरल्याचे चित्र दिसत आहे. 'लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत' असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला गृहित धरल्यास हीच जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
 
- आधी बिहारच्या पोटनिवडणुकांत व आता उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरातच्या पोटनिवडणुकांत विचित्र निकाल आहेत. परंपरेने भाजपकडे असलेल्या जागांवर कॉंग्रेस किंवा ‘सपा’ने विजय मिळवावा हे जनमनाचे गूढ म्हणावे लागेल. लोकसभेत ज्याप्रमाणे दुश्मनांचे पोट फाडून भाजप विजयाचा नरसिंह बाहेर आला तसे पोटनिवडणुकांत झाले नाही. 
 
- लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात मुसंडी मारणा-या भाजपाला पोटनिवडणुकांत मात्र  यश मिळवता आले नाही. तेथील ११ जागांपैकी ९ समाजवादी पार्टीने तर २ भाजपने जिंकल्या. ‘भाजप’च्या ताब्यातील काही जागांवरही सपाने विजय मिळला. राजस्थानातही भाजपाला जोरदार धक्का बसला असून ४ पैकी ३ जागा कॉंग्रेसने जिंकल्या व १ जागा भाजपला मिळाली. मोदींच्या गुजरातमध्ये ९ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या हे खरे, पण ३ जागा कॉंग्रेसने भाजपकडून खेचून घेतल्या. 
 
- मात्र या निकालांमुळे ‘मोदी लाट ओसरली होऽऽ’ अशा हाकाट्या सुरू झाल्या आहेत. पोटनिवडणुकांचा व मोदी लाटेचा संबंध जोडू नये. लोकसभा निवडणुका वेगळ्या व राज्याच्या निवडणुका वेगळ्या हे लक्षात घेतले पाहिजे. प्रत्येक निवडणुकीची हवा वेगळी असते व प्रत्येक निकालानंतर हवा बदलत जाते. लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत व विधानसभांच्या निकालांवर जिल्हा परिषदा किंवा महानगरपालिकांच्या निवडणुका लढता येणार नाही. 
 
- लोकांची मने चंचल असतात, त्याचा हा निर्णय आहे. पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी धडा आहे. तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. पाय जमिनीवर ठेवा. विजयाचा उन्माद चढू देऊ नका व हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल!