'DMK' जाण्याचे सत्तेतून जाण्याचे काउंटडाउन सुरू...', पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूमधून हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 18:05 IST2026-01-23T18:02:26+5:302026-01-23T18:05:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चेन्नई दौऱ्यावर होते. आज त्यांनी एनडीएच्या रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीपूर्वी द्रमुक सरकारवर भ्रष्टाचार, माफिया आणि गुन्हेगारीचा आरोप केला.

'DMK's countdown to exit from power has begun...', Prime Minister Modi's attack from Tamil Nadu | 'DMK' जाण्याचे सत्तेतून जाण्याचे काउंटडाउन सुरू...', पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूमधून हल्लाबोल

'DMK' जाण्याचे सत्तेतून जाण्याचे काउंटडाउन सुरू...', पंतप्रधान मोदींचा तामिळनाडूमधून हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी केरळ दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी डीएमकेवर निशाणा साधला. पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज पीएम मोदींची सभा झाली. 

मोठी बातमी! छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात निर्दोष मुक्तता

तमिळनाडूमधील द्रमुक सरकारचे काउंटडाऊ सुरू झाले आहे, असा टोला मोदींनी लगावला. द्रमुक सरकारला "सीएमसी" सरकार म्हणत पंतप्रधान म्हणाले की, ते आता "भ्रष्टाचार, माफिया आणि गुन्हेगारी' चे प्रतीक आहे. तामिळनाडूच्या लोकांनी पक्षाला उखडून टाकण्याचा आणि बदलासाठी मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "तामिळनाडूमध्ये आता असे सरकार आहे याचा लोकशाही आणि जबाबदारीशी काहीही संबंध नाही. द्रमुक सरकार फक्त एकाच कुटुंबाची सेवा करत आहे.

जर कोणाला पक्षात प्रगती करायची असेल तर त्यांच्याकडे फक्त तीन किंवा चार मार्ग आहेत, घराणेशाही, भ्रष्टाचार, महिलांचा अपमान किंवा आपल्या संस्कृतीचा अपमान, अशी टीका मोदींनी केली.

"केंद्रातील एनडीए सरकारने तामिळनाडूच्या विकासासाठी अभूतपूर्व काम केले आहे. काँग्रेस आणि द्रमुक केंद्रातही सत्तेत होते आणि त्यांच्या सरकारने त्यांच्यापेक्षा तिप्पट जास्त पैसे वाटले असल्याचे मोदींनी सांगितले. "एससी/एसटी आणि इतर मागासवर्गीय गटांच्या कल्याणाच्या नावाखाली त्यांच्या सरकारने फक्त भ्रष्टाचार केला आहे, असा आरोपही 'डीएमके'वर पीएम मोदींनी केला.

Web Title : DMK के सत्ता से जाने की उलटी गिनती शुरू: पीएम मोदी का तमिलनाडु से हमला

Web Summary : केरल दौरे पर पीएम मोदी ने डीएमके पर निशाना साधा, इसे भ्रष्ट और वंशवादी बताया। उन्होंने डीएमके सरकार पर केवल एक परिवार की सेवा करने और केंद्र के धन के बावजूद तमिलनाडु के विकास की उपेक्षा करने का आरोप लगाया।

Web Title : DMK's countdown to power loss begins: PM Modi attacks from Tamil Nadu.

Web Summary : PM Modi, on a Kerala visit, criticized DMK, calling it corrupt and dynastic. He accused the DMK government of serving only one family and neglecting Tamil Nadu's development despite central funds.