घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:10 IST2025-11-18T17:09:40+5:302025-11-18T17:10:47+5:30
Karnataka Crime News: मेट्रो सेवेमध्ये कर्मचारी असलेल्या घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ केला जात असल्याचा दावा करत हा छळ न थांबल्यास बंगळुरूमधील मेट्रो स्टेशन बॉम्बस्फोट करून उडवून देईन, अशी धमकी एका व्यक्तीने दिल्याने खळबळ उडाली आहे.

घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ, माजी पती संतप्त, दिली मेट्रो स्टेशन उडवण्याची धमकी, त्यानंतर...
मेट्रो सेवेमध्ये कर्मचारी असलेल्या घटस्फोटित पत्नीचा मानसिक छळ केला जात असल्याचा दावा करत हा छळ न थांबल्यास बंगळुरूमधील मेट्रो स्टेशन बॉम्बस्फोट करून उडवून देईन, अशी धमकी एका व्यक्तीने दिल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीने ईमेल पाठवून ही धमकी दिली होती. या धमकीमुळे बंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये खळबळ उडाली. दरम्यान, या प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार एका अज्ञात व्यक्तीने १४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास बंगळुरू मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अधिकृत ई मेल आयडीवर बॉम्बस्फोट घडवण्यासंदर्भात एक मेसेज पाठवला होता. त्यानंतर बीएमआरसीएलने विल्सन गार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला.ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने ‘त्याची घटस्फोटीत पत्नी ही मेटोमध्ये कर्मचारी आहे. तसेच तिचा कामाच्या ठिकाणी मानसिक छळ केला जात आहे. तसेच हा छळ थांबला नाही तर कुठल्यातरी मेट्रो स्टेशनमध्ये स्फोट घडवून आणावा लागेल, असा आरोप केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एवढंच नाही तर मी एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे काम करेन, अशी धमकीही हा ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीने दिली होती. ही धमकी कन्नड लोकांविरोधात होती. हा ईमेल मिळाल्यानंतर पोलिसांनी आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवत पुढील तपास सुरू केला आहे.