हुरियतच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत

By Admin | Updated: September 20, 2015 22:45 IST2015-09-20T22:45:21+5:302015-09-20T22:45:21+5:30

जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे अज्ञात बंदूकधाऱ्याने एका तीन वर्षांच्या बालकाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सने रविवारी पुकारलेल्या

Disruption of life due to Hurriyat | हुरियतच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत

हुरियतच्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर येथे अज्ञात बंदूकधाऱ्याने एका तीन वर्षांच्या बालकाची गोळ्या घालून हत्या केल्याच्या निषेधार्थ हुरियत कॉन्फरन्सने रविवारी पुकारलेल्या काश्मीर बंदमुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झाले होते.
खोऱ्यात आणि प्रामुख्याने श्रीनगरमधील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने आणि पेट्रोल पंप बंद ठेवण्यात आले होते. सार्वजनिक वाहनेही रस्त्यावर धावली नाहीत.
तथापि, एक-दोन खासगी मोटारी आणि आॅटोरिक्षा मात्र रस्त्यावर दिसल्या, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. काश्मीरच्या अन्य भागांतही बंदचा प्रभाव जाणवला. (वृत्तसंस्था)

Web Title: Disruption of life due to Hurriyat