लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 21:23 IST2022-05-17T21:21:42+5:302022-05-17T21:23:50+5:30
Accident Case : हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

लग्नात विघ्न, कार झाडावर आदळल्याने एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील नौरंगिया पोलीस स्टेशन परिसरात मंगळवारी एक अनियंत्रित कार झाडावर आदळल्याने मोठा अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला. हे सर्व लोक एका लग्न समारंभात सहभागी होणार होते असे सांगण्यात येत आहे. वाटेत कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
कारचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी एकाच कुटुंबातील सदस्य वाल्मिकीनगर लव-कुश घाट येथून कारने नवलपूरला जात होते. दरम्यान, हरडियाचाटीजवळील वळणावर चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचवेळी काही लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला
नौरंगिया स्टेशन प्रभारी राजेश झा यांनी सांगितले की, रामबाबू चौधरी, मंटू साहनी, मंटूची मुलगी अर्चना (7) आणि बेबी (3) अशी मृतांची नावे आहेत. ते पुढे म्हणाले की, सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. जखमींची प्रकृती सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.