शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

निर्गुंतवणूक, निवडणूक रोख्यांंवरून विरोधकांचा संसदेत गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 02:12 IST

मोठे आर्थिक घोटाळे असल्याचा आरोप

नवी दिल्ली : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल)सहित काही सार्वजनिक उपक्रमांमध्ये होऊ घातलेली निर्गुंतवणूक प्रक्रिया, निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचा निर्णय हे खूप मोठे आर्थिक घोटाळे आहेत, अशी टीका करीत विरोधी पक्षांनी लोकसभेमध्ये गुरुवारी गदारोळ माजविला.या मुद्यांवरून काँग्रेसचे खासदारांनी सभागृहाच्या हौद्यामध्ये जमा होऊन सुमारे पंधरा मिनिटे निदर्शने केली. मात्र, हे विषय शून्य प्रहरात उपस्थित करण्याची परवानगी देण्याची लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी तयारी दाखविल्यानंतर काँग्रेसचे सदस्य आपल्या आसनांवर पुन्हा विराजमान झाले.निर्गुंतवणूक प्र्रक्रिया, निवडणूक रोखे हा मोठा आर्थिक घोटाळा असून, त्याद्वारे देशाची लूट होत आहे, असा आरोप काँग्रेसने केला. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी म्हणाले की, सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पडण्यासाठी विरोधक सहकार्य करीत असून, लोकसभाध्यक्ष मात्र त्यांच्याशी तसे वागत नाहीत. त्यावर संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत स्वच्छ कारभार करीत असून, त्यामुळे भ्रष्टाचार होणे शक्यच नाही.बीपीसीएल, शिपिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियासहित पाच सार्वजनिक उपक्रमांमध्ये निर्गुंतवणूक करण्याचे केंद्र सरकारने बुधवारी जाहीर केले. निवडणूक रोखे खरेदी करणाऱ्यांची ओळख गोपनीय राखण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्याला काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला आहे.कामकाज तहकूबनिवडणूक रोखे व काही सार्वजनिक उपक्रमांमधील निर्गुंतवणूक प्रक्रिया या विषयांवर चर्चा करण्यास सभापतींनी परवानगी नाकारल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी गदारोळ माजविल्याने राज्यसभेचे कामकाज गुुरुवारी दुपारपर्यंत तहकूब करण्यात आले.अन्य कामकाज बाजूला ठेवून या दोन विषयांवर प्राधान्याने चर्चा करावी, अशी विरोधकांची भूमिका होती. ती सभापती व्यंकय्या नायडू यांनी अमान्य केल्याने विरोधकांनी इतका गदारोळ माजविला की, सभागृहाचे कामकाज करणे अशक्य झाले होते.