शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

महाराष्ट्रासह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’चा थेट पुरवठा; भारत बायोटेकच्या संचालिकांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 6:06 AM

कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे.

हैदराबाद : महाराष्ट्र आणि दिल्लीसह १४ राज्यांना ‘कोव्हॅक्सिन’ या कोरोनावरील लसीचा थेट पुरवठा करणे सुरू केले आहे, अशी माहिती भारत बायोटेकच्या सहव्यवस्थापकीय संचालिका सुचित्रा एल्ला यांनी दिली.एल्ला यांनी याबाबत ट्विट सांगितले की, केंद्र सरकारच्या वाटपानुसार लसीचा पुरवठा करण्यात येत आहे. कंपनीने १ मेपासून पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कंपनीने आंध्र प्रदेश, तेलंगणा, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांना आतापर्यंत ‘कोव्हॅक्सिन’चा पुरवठा करण्यात आला आहे. ही लस ‘आयसीएमआर’च्या सहकार्यातून भारत बायोटेकने विकसित केली आहे. ही संपूर्णपणे स्वदेशी लस असून राज्य सरकारसाठी या लसीची किंमत ४०० रुपये प्रति मात्रा ठेवण्यात आली आहे. ही लस विविध टप्प्यांमधील चाचण्यांमध्ये ८१ टक्के प्रभावी ठरली आहे. केंद्र सरकारने १ मेपासून सुरू केलेल्या लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारांना लसीची स्वतंत्र खरेदीची परवानगी दिली आहे. तसेच खासगी रुग्णालये आणि काॅर्पोरेट कंपन्यांनाही मुभा दिली आहे.

दिवसरात्र एक करून लस पुरवणार- तिसऱ्या टप्प्यासाठी अनेक राज्यांकडून कंपनीकडे मागणी नोंदविण्यात आली आहे. - लसीच्या उपलब्धतेनुसार दिवस-रात्र एक करून राज्यांना साठा पोहोचविण्यात येईल, असे आश्वासन एल्ला यांनी दिले आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र