व्हॉट्सअपवरचा चुकीचा मेसेज वापरून दिग्विजय सिंहांनी मोदी सरकारच्या नावे फाडलं 'तिकीट'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 12:47 PM2020-08-18T12:47:41+5:302020-08-18T12:51:31+5:30

देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे.

Digvijay Singh shared pune junction platform 'ticket' in Modi government's name by using wrong message on WhatsApp | व्हॉट्सअपवरचा चुकीचा मेसेज वापरून दिग्विजय सिंहांनी मोदी सरकारच्या नावे फाडलं 'तिकीट'

व्हॉट्सअपवरचा चुकीचा मेसेज वापरून दिग्विजय सिंहांनी मोदी सरकारच्या नावे फाडलं 'तिकीट'

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खासगीकरणाचा परिणाम म्हणत काँग्रेस व भाजपा सरकारच्या काळातील पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटांची तुलना केली आहे.

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व रेल्वे गाड्या बंद आहेत, त्यामुळे रेल्वेचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. सध्या सरकारच्या परवानगीनेच विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल रेल्वेसेवाही गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना रेल्वे स्थानकावर प्रवेश देण्यात येतो. मात्र, पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मचे तिकीट 50 रुपये केल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. व्हाट्सअपवर खोटा मेसेज लिहून हे तिकीट व्हायरल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजयसिंह हेही या खोट्या मेसेजचे शिकार ठरले आहेत. 

खासगीकरणामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये? जाणून घ्या व्हायरल सत्य

देशभरातील रेल्वे गाड्यांच्या खासगीकरणावरून मोठा वाद सुरू आहे. मोदी सरकारच्या या निर्णयावर विरोधकांनी सडकून टीका केली. त्यानंतर कोणत्याही प्रकारे रेल्वेचे खासगीकरण केले जाणार नाही, असं रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केलं आहे. सध्या कार्यरत असलेल्या रेल्वेच्या सर्व सेवा चालविल्या जातील. रेल्वे मंत्रालयाने खासगी कंपन्यांना 109 मार्गावर प्रवासी गाड्या चालविण्यास दिल्या होत्या. ज्यामध्ये खासगी कंपन्यांना 30 हजार कोटींची गुंतवणूक करावी लागली. त्यानंतर गाड्यांच्या खासगीकरणाबाबत चर्चा सुरू झाल्या. रेल्वेच्या या खासगीकरणाला अनुसरुनच सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. रेल्वेनं खासगीकरण केल्यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलंय. पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटाच्या फोटोसह हा मेसेज सोशल मीडियात व्हायरल होत आहे. मात्र, या तिकीटामागील सत्य वेगळंच आहे. याबाबत पुणे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी माहिती दिली आहे. 


काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन खासगीकरणाचा परिणाम म्हणत काँग्रेस व भाजपा सरकारच्या काळातील पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीटांची तुलना केली आहे. मात्र, दिग्विजयसिंह यांनी केलेला खासगीकरणामुळे वाढलेल्या तिकीटदराचा दावा खोटा असून केवळ लॉकडाऊनमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. 

पुणे रेल्वेचं स्पष्टीकरण

देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर, रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच रेल्वेचा वापर होत आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये, प्रवाशांनी विनाकारण फेरफटका मारु नये म्हणून पुणे रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये करण्यात आलंय. सध्या केवळ बुकिंग कन्फर्म असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे स्थानकावर प्रवेश दिला जातो. मात्र, अत्यावश्य सेवा देणाऱ्यांसोबत किंवा काही वैद्यकीय सेवेतील प्रवाशांसोबत नातवाईकही रेल्वे स्थानकावर येतात. मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचं पालन व्हावं आणि गर्दी टाळावी यासाठी हे तिकीट 50 रुपये करण्यात आल्याचं मनोज झंवर यांनी लोकमतशी बोलताना सांगितलं. 

लॉकडाऊन पूर्वी हे तिकीट 10 रुपये होतं. केवळ लॉकडाऊन काळातील सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून रेल्वेच्या खासगीकरणासाठी याचा काहीही संबंध नसल्याचेही झंवर यांनी स्पष्ट केले. तसेच, रेल्वे सेवेसंदर्भात पुढील आदेश आल्यानंतर तिकीटाच्या दराबाबत विभागीय प्रमुखांकडून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
 

Web Title: Digvijay Singh shared pune junction platform 'ticket' in Modi government's name by using wrong message on WhatsApp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.