चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 11:37 IST2025-07-16T11:35:58+5:302025-07-16T11:37:08+5:30

pib fact check fake video claims india lost s400 to china digitally altered army video india goes viral

Did India lose S-400 air defense system due to Chinese missile Shocking truth revealed | चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य

चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. यात, भारतीय लष्कराचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल राहुल आर. सिंह यांनी, चिनी मिसाईलमुळे भारताने S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली, असे स्वीकारल्याचा खोटा दाव केला जात आहे.
 
खरे तर, हा दावा पूर्ण पणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे PIB Fact Check ने म्हटले आहे. संबंधित व्हिडिओ डिजिटली मॅनिपुलेट करण्यात आला असून चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. हा व्हिडिओ 4 जुलै 2025 चा आहे. FICCI ने (Federation of Indian Chambers of Commerce and Industry) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमातील आहे.

व्हिडिओ एडिट करून चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न - 
या कार्यक्रमात लेफ्टनन्ट जनरल राहुल आर. सिंह यांनी संबोधित केले होते. मात्र, त्यांनी त्यांच्या भाषणात कुठेही S-400 सिस्टिम नष्ट झाल्यासंदर्भात अथवा चीनने हल्ला केल्यासंदर्भात कसल्याही प्रकारचे भाष्य केले नव्हते. मात्र, व्हायरल होत असलेला व्हिडिओ एडिट करून खोटी माहिती पसरवली जात आहे. 

काय आहे सत्य -
हा व्हिडिओ भारतीय लष्कराची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने पसरवला जात आहे. दरम्यान, नागरिकांनी कोणताही संशयास्पद व्हिडिओ शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टची ताकद - 
भारताची S-400 एअर डिफेन्स सिस्टिम अथवा हवाई संरक्षण प्रणाली ही जगातील सर्वात प्रगत एअर डिफेन्स सिस्टिम्सपैकी एक आहे. ही सिस्टिममध्ये उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असून शत्रूची क्षेपणास्त्रे, लढाऊ विमाने आणि ड्रोनना आधीच रोखण्यात सक्षम आहे.

Web Title: Did India lose S-400 air defense system due to Chinese missile Shocking truth revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.