शहरं
Join us  
Trending Stories
1
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
3
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
4
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
5
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
6
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
7
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
8
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
9
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
10
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
11
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२६: 'या' २ राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा, अचानक खर्च होईल पैसा
13
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
14
'आधार'मधील बायोमेट्रिक 'त्रुटीभार' नागरिकांवर नको; मुंबई उच्च न्यायालयाने दिले 'यूआयडीएआय'ला निर्देश
15
हरयाणा ते बंगाल : मोदींच्या नेतृत्वात ९ राज्यांत भाजपाचे मुख्यमंत्री; अस्तित्व नसलेल्या राज्यांत रोवले भक्कम पाय
16
बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांवर उच्च न्यायालयाचा बडगा! राज्यात १२० दिवसांत पडताळणी अनिवार्य
17
विशेष लेख: विरोधी पक्ष दिसला तर लाखाचे बक्षीस द्यायचे का?
18
९४ हजार विद्यार्थ्यी मराठी विषयात नापास, अभिजात दर्जा मिळालेल्या मराठीत अपयश ही धोक्याची घंटा
19
प्रिमियम एफएसआयला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शेतकऱ्यांना 'टीडीआर'च्या माध्यमातून दिलासा
20
रशिया-युक्रेनमध्ये ३ दिवसांचा युद्धविराम; ट्रम्प यांच्या मध्यस्थीला यश, १ हजार कैद्यांची अदलाबदल
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:25 IST

धुबरी शहरात ८ जून रोजी एका मंदिराबाहेर गोमांस फेकण्याच्या घटनेवरून वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेविरोधात काही संघटनांनी मोर्चाही काढला

आसामच्या धुबरी जिल्ह्यात अलीकडेच धार्मिक तणाव वाढला आहे. त्यावर मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी कठोर प्रतिक्रिया दिली. ईदच्या दिवशी काही समाजकंटकांनी धुबरीच्या हनुमान मंदिराबाहेर गोमांस फेकले. ही अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय घटना आहे. एक विशेष वर्ग आमच्या मंदिरांना नुकसान पोहचवण्याच्या दृष्टीने सक्रीय झाला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर समाजकंटकांना पाहताच गोळी मारण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा पुढे म्हणाले की, पुढच्या ईदला जर आवश्यकता भासली तर मी स्वत: रात्रभर हनुमान मंदिराबाहेर पहारा देईन. धुबरीत नवीन गोमांस माफिया समोर आले आहेत. ज्यांनी ईदच्या आधी हजारो जनावरे खरेदी केली होती. पोलिसांचा तपास सुरू आहे. गुन्हेगारांना पोलीस कोठडीत टाकले जाईल. मी धुबरी दौरा केला आहे. तिथे आमच्या मंदिरांना आणि पवित्र स्थानांना अपवित्र करणाऱ्या समाज घटकांविरोधात झीरो टॉलरेंस धोरण वापरण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच शहरात कधीही मंदिराबाहेर गोमांस फेकण्याची घटना पुन्हा व्हायला नको, यात जे कुणी सहभागी असतील त्यांना सोडले जाणार नाही. आम्ही जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था कायम राखून सर्व सांप्रदायिक ताकदीविरोधात लढण्यासाठी कटिबद्ध आहोत असं आसामचे मुख्यमंत्री हिंमत बिस्वा यांनी म्हटलं.

दरम्यान, नुकतेच आसाम आणि बांगलादेशात काही समाजकंटक सक्रिय झालेत. एक विशेष वर्ग ऑनलाईन आणि ऑन ग्राऊंड सक्रीय झाला आहे. सुनियोजितपणे राज्यात नकारात्मक वातावरण बनवण्याचा प्रयत्न करत आहेत असंही मुख्यमंत्री बिसवा यांनी सांगितले. आसामच्या धुबरी शहरात ८ जून रोजी एका मंदिराबाहेर गोमांस फेकण्याच्या घटनेवरून वातावरण चांगलेच तापले होते. या घटनेविरोधात काही संघटनांनी मोर्चाही काढला. त्यानंतर बिघडलेली कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी