धामणीत हरिनाम सप्ताह सुरू
By admin | Updated: September 4, 2015 21:54 IST
लोणी धामणी - धामणी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रविवारी (दि. ३०) अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. हा सप्ताह रविवारी (दि. ६) संपन्न होणार असल्याची माहिती या सप्ताहाचे संयोजक ह.भ.प. पांडुरंगमहाराज बोर्हाडे व धामणी ग्रामस्थांनी दिली.
धामणीत हरिनाम सप्ताह सुरू
लोणी धामणी - धामणी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त रविवारी (दि. ३०) अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. हा सप्ताह रविवारी (दि. ६) संपन्न होणार असल्याची माहिती या सप्ताहाचे संयोजक ह.भ.प. पांडुरंगमहाराज बोर्हाडे व धामणी ग्रामस्थांनी दिली.या सप्ताहात अर्जुनमहाराज तांबे, शांताराममहाराज विधाटे, ह.भ.प. मधुकरमहाराज गायकवाड (गावडेवाडी) व बळवंत गुरुजी विधाटे धामणी यांची प्रवचने संपन्न झाली आहेत. तर या सप्ताहात विष्णूमहाराज केंद्रे (आळंदी), ह.भ.प. पोपटमहाराज राक्षे (खेड), भास्करमहाराज पवार (आळंदी), धनंजयमहाराज चव्हाण (सातारा), बबनमहाराज शिनलकर (लोणी) यांची श्रीहरिकीर्तने संपन्न झाली आहेत. या सप्ताहात रोहिदासमहाराज हारदे (साकूर मांडवा) यांचे श्रीकृष्णजन्माचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहाची सांगताही रोहिदासमहाराज हारदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. सर्व भाविकांनी तनमनधनाने, आबालवृद्धांनी या ज्ञानदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन धामणी ग्रामस्थांनी केले आहे.