विस्तारित नागपूरचा विकास मुलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -२

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:07+5:302014-12-25T22:41:07+5:30

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेद्वारा या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे घर तेथे शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान वाढविल्यामुळे आता अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Development of extended Nagpur through basic facilities- 2 | विस्तारित नागपूरचा विकास मुलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -२

विस्तारित नागपूरचा विकास मुलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -२

णीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की, राज्यातील नागरिकांना स्वच्छ व शुद्ध पाणी देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे. नागपूर पेरी अर्बन पाणीपुरवठा योजनेद्वारा या भागातील नागरिकांना स्वच्छ पाणी मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे घर तेथे शौचालय बांधण्यासाठी केंद्र सरकारने अनुदान वाढविल्यामुळे आता अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविक सदस्य सचिव सोनिया सेठी यांनी केले. अधीक्षक अभियंता सुरेश चारथळ यांनी आभार मानले.

बॉक्स..
एक पैसा लिटर प्रमाणे मिळणार पाणी
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर पेरी अर्बन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यावर बेसा बेलतरोडी भागातील दहा गावाच्या नागरिकांना एक पैसा लिटर याप्रमाणे पाणी मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे ही योजना पूर्ण करण्यासाठी दहा टक्के लोकवर्गणीची अट शासनाने रद्द केल्याचे त्यांनी नमूद केले. या भागातील दीड लाख परिवारांना नियमित करण्याची विनंती त्यांनी याप्रसंगी केली.

बॉक्स..
२४ तास ७ दिवस मिळणार पाणी

अध्यक्षपदावरून बोलतांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ही योजना पूर्ण होताच २४ तास ७ दिवस नागरिकांना पाणी मिळेल. विस्तारीत होणाऱ्या नागपूरच्या भागात कंट्राटदारांनी अवैध कामे करू नये. सर्व कामे ही नियमाने करावीत. झपाट्याने शहरीकरण होत असल्याचे सांगून गडकरी म्हणाले, शहराकडे येणारा लोंढा थांबविण्यासाठी गावे विकसित झाली पाहिजे. विकसित गावांसाठी नियोजन करण्यात येत आहे. गावपातळीवर रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. सर्वांना शुद्ध व स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे तसेच पाण्याचा पुनर्वापर कसा होईल, यादृष्टीने नागरिकांनी प्रयत्न करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Development of extended Nagpur through basic facilities- 2