शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
3
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
4
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
5
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
6
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
7
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
8
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
9
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
10
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
11
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
12
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
13
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
14
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
15
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
16
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
17
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
18
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
19
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
20
सावध व्हा! कीटकनाशके आणि प्लास्टिकमुळे प्रजनन क्षमतेत घट; पशू-पक्ष्यांवरही परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विस्तारित नागपूरचा विकास मूलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार -१

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

विस्तारित नागपूरचा विकास

विस्तारित नागपूरचा विकास
मूलभूत सुविधांच्या माध्यमातून साधणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : २३२ कोटीच्या पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन
नागपूर :
बेसा-बेलतरोडी भागात नागपूर शहराचा वेगाने विस्तार होत आहे. विस्तारित नागपूरच्या भागात पाणीपुरवठा योजना सुरू करून येथील मूलभूत सुविधांच्या माध्यमातून विस्तारित नागपूरचा विकास साधला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बेसा येथे नागपूर निमशहरी, प्रादेशिक पाणी योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय भूपृष्ठ परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी होते. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, आमदार जयकुमार रावल, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव राजेशकुमार, महाराष्ट्र प्राधिकरणाच्या सदस्य सचिव सोनिया सेठ, पंचायत समिती सभापती नर्मदा राऊत, बेसाच्या सरपंच शालिनी कंगाली यावेळी उपस्थित होते.
नागपूरलगतच्या बेसा-बेलतरोडी पिपळा, घोगडी, हुडकेश्वर (खुर्द), खरबी, बहादुरा, गोन्ही आणि कापसी (खुर्द) या गावासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. या योजनेवर २३२ कोटी ७४ लक्ष रुपये खर्च करण्यात येणार आहे. ही योजना सप्टेंबर २०१६ अखेर पूर्ण होणार असून दहा गावातील नागरिकांना प्रती व्यक्ती ७० लीटर शुद्ध व स्वच्छ पाणी दररोज उपलब्ध होणार आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मेट्रो रिजन आणि त्याअंतर्गत असलेल्या योजना प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील. नगररचना कायदा मंजूर केल्यामुळे आता नियोजनबद्ध पद्धतीने शहराचा विकास करता येईल. विकास करताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येतील. गावठाणच्या भागाची परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला दिल्यामुळे ते अधिकृत ठरतील. घरांचे ५६ प्रकारचे टाईप प्लान शासनाने तयार केल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, या टाईप प्लाननुसार नागरिकांनी बांधकामासाठी अर्ज केल्यास सात दिवसाच्या आत मंजुरी देण्यात येईल. विकास हा नियमानुसार व्हावा तो अवैध प्रकार होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बेसा-बेलतरोडी भागासाठी नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.