शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे, राहुल गांधींचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2020 08:01 IST

प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे.

ठळक मुद्देभाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होतीमात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचे भाजपाने स्पष्ट केले होतेराष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून राहुल गांधी यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बिकट झाली आहे. दररोज हजारांहून अधिक रुग्ण सापडत असल्याने विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहेत. त्यातच कोरोनाला रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीह होत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्या विरोधकांवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी हल्ला चढवला आहे. राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे, अशी घणाघाती टीका राहुल गांधी यांनी केली आहे.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपा खासदार नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. मात्र ही राणेंची वैयक्तिक मागणी असल्याचे भाजपाने स्पष्ट केले होते. त्यावरून राहुल गांधी यांनी भाजपाला टीकेचे लक्ष्य केले आहे. राहुल गांधी म्हणाले की, ‘’प्रश्न विचारल्यामुळे सरकारलाही फायदा होतो. मात्र राष्ट्रपती राजवटीची मागणी करणे हे लोकशाहीच्या चौकटीला धक्का देणारे आहे.’’

दरम्यान, राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली होती. आम्ही महाराष्ट्रात सरकारला पाठिंबा देत आहोत. मात्र निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही पंजाब, छ्त्तीसगड आणि राजस्थानमध्ये निर्णय घेण्याचा स्थितीत आहोत, असे ते म्हणाले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या   

गरज पडल्यास आमचे सैन्य लढण्यास तयार, नेपाळच्या संरक्षणमंत्र्यांची भारताला धमकी

लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त

चिंताजनक! अ‍ॅमेझॉनच्या जंगलातही कोरोनाचा शिरकाव, अनेक आदिवासी जमातींचे अस्तित्व संकटात

पहिल्याच दिवशी विमानसेवेचा बोजवारा, दिल्ली, मुंबईतून जाणारी अनेक विमाने रद्द, प्रवाशांना मनस्ताप

कोरोनामुळे निर्माण झालेल्या तणावादरम्यान अमेरिकेचा चीनला तगडा धक्का, केली मोठी कारवाई 

लॉकडाऊन आणि मंदीचे सावट असतानाही ही कंपनी करणार ५० हजार कर्मचाऱ्यांची मेगाभरती 

लोकसंख्येची घनता जेवढी जास्त, तेवढाच कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यामुळेच कोरोनाचे रुग्ण अधिक प्रमाणात सापडत आहेत. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मिळाली पाहिजे. आम्ही केंद्र सरकारला सल्ला देऊ शकते. मात्र सरकारला काय करायचे आहे, ते त्यांनाच ठरवायचे आहे, असेही राहुल गांधी यांनी सांगितले होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाPresident Ruleराष्ट्रपती राजवटCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस