शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 09:24 IST

Brahmos Missile : भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली.

भारत आणि पाकिस्तान दरम्यान मे महिन्यात झालेल्या संघर्षात ब्रह्मोस मिसाइलने महत्त्वाची भूमिका बजावली. या मिसाइलची ताकद अवघ्या जगाने पाहिली. ऑपरेशन 'सिंदूर' अंतर्गत भारताने ब्रह्मोस मिसाइल वापरून पाकिस्तानवर हल्ला केला होता. या मिसाइलची अभूतपूर्व कामगिरी पाहिल्यानंतर आता जगभरातून तिची मागणी वाढली आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर तब्बल १४-१५ देशांनी ब्रह्मोस मिसाइल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

राजनाथ सिंह म्हणाले की, "ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाइलची भूमिका निर्णायक होती. याच कारणामुळे, तेव्हापासून आतापर्यंत डझनहून अधिक देशांनी ब्रह्मोस मिसाइलमध्ये रुची दाखवली आहे आणि त्यांना ती खरेदी करायची आहे."

१४-१५ देश रांगेत!

त्यांनी पुढे सांगितलं, "काही दिवसांपूर्वीच, मी लखनऊमध्ये ब्रह्मोस एअरस्पेस इंटिग्रेशन आणि चाचणी केंद्राचं उद्घाटन केलं. तुम्ही पाहिलं असेल की, ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोस मिसाइलने चमत्कारी काम केलं आहे आणि एवढंच नाही, तर ब्रह्मोस मिसाइलच्या या 'चमत्कारानंतर' जगातील जवळपास १४-१५ देशांनी भारताकडे ब्रह्मोस मिसाइलची मागणी केली आहे."

राजनाथ सिंह म्हणाले, "ब्रह्मोस मिसाइलची निर्यात आता लखनऊमधूनही केली जाईल. मला विश्वास आहे की ही सुविधा संरक्षण क्षेत्रात आपल्या देशाच्या आत्मनिर्भरतेला बळकटी देईल आणि त्याचबरोबर रोजगारही निर्माण करेल. लखनऊसोबतच राज्याचाही वेगाने विकास व्हावा यासाठी इथे आणखी उद्योग यावेत, हा माझा प्रयत्न आहे."

ब्रह्मोस केवळ मिसाइल नाही, तर आत्मविश्वासाची ओळख!संरक्षण मंत्र्यांच्या मते, ब्रह्मोस ही आता केवळ एक मिसाइल राहिली नसून, ती भारताच्या सैन्य आत्मविश्वासाची ओळख बनली आहे. ऑपरेशन सिंदूरमधील तिच्या कामगिरीने जग थक्क झालं आहे. भारत आता केवळ संरक्षण सामग्री आयात करणारा देश राहिला नसून, एक जागतिक संरक्षण निर्यातदार बनत आहे.

मजबूत पायाभूत सुविधांमुळे ऐतिहासिक बदल : राजनाथ सिंहराजनाथ सिंह यांनी दावा केला की, मजबूत कायदा-सुव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या बळावर उत्तर प्रदेश अधिकाधिक उद्योगांना आकर्षित करत आहे. ते म्हणाले, "पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक बदल होत आहेत. एक्सप्रेस-वे, विमानतळ, मेट्रो, मेडिकल कॉलेज - हे सर्व विकासाचं एक नवीन चित्र सादर करत आहेत."

टॅग्स :Brahmos Missileब्राह्मोसOperation Sindoorऑपरेशन सिंदूरRajnath Singhराजनाथ सिंहIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तान