शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुलात सामाजिक न्याय भवन बनवा रिपाइं (आ) च्या जिल्हाध्यक्षांची मागणी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल या जागी न्याय भवन उभारावे, अशी मागणी रिपाइं (आ)चे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.

अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शासनाने निमवाडी, पोलीस लाइनमधील प्रस्तावित केलेली जागा रिपाइं (आ) पक्षाला मान्य नसून, महायुतीच्या शासनाने ही प्रस्तावित जागा रद्द करून रामदासपेठेतील क्रीडा संकुल या जागी न्याय भवन उभारावे, अशी मागणी रिपाइं (आ)चे जिल्हाध्यक्ष अशोक नागदेवे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नागदेवे म्हणाले, की महाराष्ट्र शासनाने प्रत्येक जिल्ह्यातील दलित, मागासवर्गीय, आदिवासींचे सामाजिक तसेच आर्थिक प्रश्न सोडविण्याकरिता जिल्हानिहाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाची निर्मिती केली आहे. अकोला जिल्ह्यातील सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न प्रलंबित आहे. मागील सरकारने निमवाडी, पोलीस लाइन येथील जागा न्याय भवनासाठी निश्चित केली आहे. प्रस्तावित सामाजिक न्याय भवन येथील जागेवर सामाजिक न्याय भवन निर्माण करण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नाहरकत प्रमाणपत्र सादर केले आहे. सामाजिक न्याय विभागाने प्रस्तावित केलेली जागा अद्यापही गृह विभागाकडून सामाजिक न्याय विभागास हस्तांतरित केलेली नाही. त्यामुळे सदर बांधकाम प्रस्तावित आहे. जिल्ह्यातील समाज बांधवांना सोईचे होईल, अशा ठिकाणी या भवनाची निर्मिती व्हायला हवी. क्रीडा संकुल हे शहराच्या मध्यभागी असल्याने सर्वांना उपयुक्त ठरेल. रिपाइं (आ) च्या वतीने लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रिपाइंचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांच्या नेतृत्वात निवेदन सादर करून क्रीडा संकुलाची जागा सामाजिक न्याय भवनासाठी मागण्यात येणार असल्याचे यावेळी नागदेवे यांनी सांगितले.

---------------
रिपाइं (आ)चा विभागीय मेळावा
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा विदर्भ प्रदेश कार्यकर्त्यांचा विभागीय मेळावा १८ फेबु्रवारी २०१५ रोजी सांस्कृतिक भवन, अमरावती येथे आयोजित केला आहे. या मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले राहणार आहेत. प्रमुख उपस्थितीमध्ये अविनाश महातेकर, उत्तम खोब्रागडे, पी. के. जैन, बाबूराव कदम, राजा सरवदे, देवेंद्र शेलेकर, एम. बी. तायडे, गौतम भालेराव, अशोक नागदेवे, गौतम सोनावणे, पुरण मेश्राम, एल. के. मडावी आदींची उपस्थिती राहणार आहे.