शहरं
Join us  
Trending Stories
1
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
2
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

Delta Plus Variant: कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याचा कोणताही पुरावा नाही; तज्ज्ञांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 2:08 PM

कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटंल आहे.

कोरोना प्रादुर्भावाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी ती कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिअंटमुळे येईल याबाबतचा कोणताही पुरावा नसल्याचं वैज्ञानिकांनी म्हटंल आहे. इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिस्क अँड इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीचे (IGIB) संचालक डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेपेक्षा सध्या दुसऱ्या लाटेकडेच लक्ष देऊन कोरोना संदर्भातील सर्व प्रोटोकॉलचं काटेकोरपणे पालन करण्यावर भर द्यायला हवं, असं म्हटलं आहे. 

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिअंट आणि संभाव्य तिसरी लाट याचा काहीच संबंध नाही. तसा कोणताही पुरावा मिळालेला नाही, असंही डॉ. अग्रवाल म्हणाले. त्यांच्या संस्थेनं महाराष्ट्रात जून महिन्यात ३,५०० हून अधिक नमुन्यांचं परीक्षण केलं आहे. यात एप्रिल आणि मे महिन्यात घेण्यात आलेल्या नमुन्यांचाही समावेश होता. डेल्टा प्लस व्हेरिअंटचा धोका वाढतोय हे नक्की आहे. पण याचे रुग्ण एक टक्क्यापेक्षाही कमी असतील, असंही ते म्हणाले. 

देशात ४० हून अधिक डेल्टा प्लसचे रुग्णदेशात सध्या डेल्टा प्लस व्हेरिअंटचे ४० रुग्ण आढळून आले आहेत. पण यामुळे घाबरुन जाण्याचं कारण नसल्याचं डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले. ज्या ठिकाणी रुग्णांची संख्या अधिक आढळून आली आहे तिथं खूप जास्त प्रसार झाल्याचं आढळून आलेलं नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. सराकारनं महाराष्ट्र,  केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांना डेल्टा प्लस व्हेरिअंटबाबत तात्काळ नियंत्रणासाठीची पावलं उचलण्याचे आदेश दिलेले आहेत. 

खूप मोठा धोका सध्या दिसत नसला असं असलं तरी याचा अर्थ गाफील राहणं असा होत नाही. देशात आज दुसऱ्या लाटेचा प्रभाव असूनही आहे. त्यामुळे दुसरी लाट संपुष्टात येईल यासाठी आधी प्रयत्न सुरूच ठेवायला हवेत. त्यासाठी आपण चिंता बाळगली पाहिजे, असं डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस