दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2019 09:22 AM2019-11-06T09:22:38+5:302019-11-06T09:41:46+5:30

दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे.

delhis deteriorating air quality to hit flight and hotel bookings | दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट

दिल्लीतील प्रदूषणामुळे पर्यटकांच्या संख्येत घट

Next
ठळक मुद्देदिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे.दिल्लीतील परदेशी पर्यटकांच्या संख्येत 10 ते 15 टक्के घट झाल्याची माहिती ही पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.सोशल मीडिया आणि माध्यमातून प्रदूषणाची माहिती मिळल्याने पर्यटकांची संख्या मंदावली आहे.

नवी दिल्ली - परदेशातून अनेक पर्यटक हे शहरातील विविध पर्यटनस्थळांना भेट द्यायला येत असतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील वायू प्रदूषणामुळे परदेशी पर्यटकांच्या संख्येत घट झाल्याची माहिती राज्य पर्यटन विभागाने दिली आहे. दिल्ली पर्यटन विभागातर्फे राजधानीत चालवण्यात येणाऱ्या होप ऑन होप ऑफच्या सेवेचा वापर करणाऱ्या पर्यटकांची संख्याही घटली आहे. या सेवेंतर्गत दररोज प्रत्येक 45 मिनिटाला सकाळी 7 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत बससेवा चालवली जाते. दिवसाला एकूण दहा फेऱ्या होतात. 

दररोज साधारण 200 ते 250 पर्यटक या सेवेचा लाभ घेतात. दिल्लीत प्रदूषणाचीवायू प्रदूषणाची समस्या गंभीर झाल्याने आता पर्यटकांच्या संख्येत घट झाली आहे. दिल्लीतील परदेशी पर्यटकांच्या संख्येत 10 ते 15 टक्के घट झाल्याची माहिती ही पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील वायू प्रदूषणाचा आरोग्यावर गंभीर परिणाम होईल अशी भीती पर्यटकांमध्ये निर्माण झाली आहे. आधी बुकिंग केलेल्या अनेक पर्यटकांनी पर्यटनासाठी येण्याच्या पुढे ढकललेल्या आहेत तर काहींनी त्या रद्द केल्या आहेत. तसेच अनेक पर्यटक फोन करून वातावरण बदलाची चौकशी देखील करत आहेत. 

सोशल मीडिया आणि माध्यमातून प्रदूषणाची माहिती मिळल्याने पर्यटकांची संख्या मंदावली आहे. शहरातील हॉटेल व्यवसाय, गेस्ट हाऊसवर परिणाम झाला असल्याचे मत दिल्ली हॉटेल महासंघाचे अध्यक्ष अरूण गुप्ता यांनी व्यक्त केले आहे. शहरात पर्यटनासाठी आलेले पर्यटक पुढे आगरा, जयपूर शहरात देखील फिरण्यास जातात. मात्र आता प्रदूषणामुळे पर्यटकांचे नियोजन विस्कळीत झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दिल्ली-एनसीआर भागामध्ये सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने आणीबाणीची परिस्थिती असल्याचे पर्यावरण प्रदूषण नियंत्रण मंडळाने (ईपीसीए) जाहीर केले. या भागामध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही बांधकाम करण्यास ईपीसीएने मनाई केली आहे. तसेच प्रदूषण आणि खराब हवामानामुळे दोन दिवस नोएडातील शाळा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा प्रशासनाने दिला आहे. प्रदूषणाने कमाल पातळीही ओलांडली असून, नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच भाजपाच्या एका मंत्र्यांनी अजब विधान केलं आहे.

दिल्ली आणि आसपासच्या राज्यांतील प्रदूषणावर भाजपाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे राज्यमंत्री सुनील भराला यांनी अजब उपाय सुचवला आहे. प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी इंद्रदेवाला खूश करा आणि यज्ञ करा, ते सगळं काही ठीक करतील, असा उपाय भराला यांनी सांगितला आहे. 'प्रदूषणाच्या समस्येला 'पराली'ला जबाबदार ठरवणं म्हणजे हा थेट शेतकऱ्यांवरच हल्ला आहे. ऊस आणि डाळींचं उत्पादन घेतल्यानंतर शेतात कचरा होतो. शेतकरी ते पेटवून देतात. त्यामुळे धूर होतो. मात्र यामुळे प्रदूषण होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जबाबदार धरू नये' असं सुनील भराला यांनी म्हटलं आहे.
 

Web Title: delhis deteriorating air quality to hit flight and hotel bookings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.