Delhi Violence bsp chief mayawati says political parties are playing dirty politics SSS | Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

Delhi Violence : 'दिल्ली हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण'

ठळक मुद्देबहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे. दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत असल्याचं मायावती यांनी म्हटलं.अरविंद केजरीवाल यांना एक सल्ला देखील दिला आहे.

नवी दिल्ली - सीएए विरोधातील आंदोलनास दिल्ली येथे सोमवारी हिंसाचाराने तडा गेल्यानंतर मंगळवारी आगडोंब उसळला. या हिंसाचारात आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. दिल्लीतील हिंसाचारावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनामध्ये बैठकांचे सत्र सुरू आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी दिल्ली हिंसाचारावर भाष्य केलं आहे. 

दिल्लीतील हिंसाचारावरून राजकीय पक्ष घाणेरडं राजकारण खेळत असल्याचं मायावती यांनी म्हटलं आहे. तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एक सल्ला देखील दिला आहे. 'दिल्लीतील हिंसाचारावर राजकीय पक्षांकडून घाणेरडं राजकारण खेळलं जात आहे. केंद्राने कोणताही हस्तक्षेप न करता पोलीस व यंत्रणेस स्वतंत्ररित्या काम करू दिलं पाहिजे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी देखील अन्य राज्यांमध्ये राजकारण करण्यापेक्षा, दिल्लीतील परिस्थिती सर्वसामान्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे' असं मायावती यांनी म्हटलं आहे.

दिल्लीत उसळलेला हिंसाचार आणि दंगल रोखण्यात सरकारला आलेल्या अपयशावरून काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिल्लीतील दंगलीवरून बुधवारी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केल्यानंतर आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळाने काँग्रेसकडून एक निवेदन राष्ट्रपतींना दिले. दिल्ली दंगलीसाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कारवाई व्हावी, तसेच दंगलीतील पीडितांना मदत देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनामधून राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे.

 

राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, प्रियंका गांधी, आनंद शर्मा, रणदीप सुरजेवाला यांच्यासह अनेक नेत्यांचा समावेश होता. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सोनिया गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, ‘ गृहमंत्री आणि पोलीस दिल्लीत उसळलेला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले. दिल्ली आणि केंद्र सरकारने दिल्लीत उसळलेल्या हिंसाचाराकडे दुर्लक्ष केले. हिंसाचारामुळे आतापर्यंत 34 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 200 हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचेही नुकसान झाले आहे.’ 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : गृहमंत्री अमित शाह यांना हटवा, सोनिया गांधींची राष्ट्रपतींकडे मागणी

Delhi Violence: आप नगरसेवक ताहीर हुसैन यांच्या घरात सापडला दगड-विटा, पेट्रोल बॉम्बचा साठा 

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

Delhi Violence: दिल्ली हिंसाचारातील पीडित बेघर मुस्लीम कुटुंबीयांना दिला हिंदू परिवाराने आसरा

 

English summary :
BSP Chief, Mayawati: In guise of #DelhiViolence, political parties are playing dirty politics. Centre should let police&system work freely, without any kind of interference.

Web Title: Delhi Violence bsp chief mayawati says political parties are playing dirty politics SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.