लाल किल्ला कार ब्लास्ट आणि फरीदाबाद टेरर मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि जम्मू-काश्मीर पुलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स टीम्सचा तपास सुरू असतानाच, जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमधून रोहतकच्या डॉक्टर प्रियांका शर्माला आदिलशी संबंधित चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर, आता प्रियांकाच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया आली आहे.
यासंदर्भात बोलताना प्रियांकाचा भाऊ भारत यांनी स्पष्ट केले आहे की, 'आपला आणि प्रियांकाचा आदिलशी दूरान्वयानेही काही संबंध नाही, रात्री सुमारे नऊ वाजता प्रियांकाशी शेवटची बोलणे झाले होती आणि त्यानंतर संपर्क होऊ शकला नाही. तिच्या रूममेटसोबत बोलणे झाल्यानंतर समजले की, तपास यंत्रणांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.'
भारत पुढे म्हणाले, 'प्रियांका जम्मू-कश्मीरमध्ये पीएचडी करत असून महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहते. चौकशीनंतर तिचा मोबाइल फोनही जप्त करण्यात आला आहे. आम्ही तपासात पूर्ण सहकार्य करू. आदिल तिचा एमडी कोर्सचा सीनियर असल्याने बोलणे झालेले असू शकते.
प्रियांका झज्जरच्या डीघलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ती मेडिसीनमध्ये एमडी करण्यासाठी जम्मू काश्मीरला गेली आहे. तिचे रोज घरच्यांसोबत व्हिडिओकॉल वरून बोलणे होत असते. दहशतवादी आदील अथवा अशा कोणत्याही नेटवर्कशी आपला संबंध नाही.
दरम्यान, जम्मू-कश्मीर पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स टीमने अनंतनागच्या मलकनाग भागातील एका भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकून प्रियांका शर्माला ताब्यात घेतले. जप्त केलेला मोबाइल फोन आणि सिम कार्डची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. जीएमसीचा माजी कर्मचारी डॉक्टर आदिलच्या अटकेनंतर मिळालेल्या माहितीनुसार, या नेटवर्कला लॉजिस्टिक किंवा आर्थिक मदत करणाऱ्यांचा शोध सुरू असून कॉल-डिटेल रेकॉर्डच्या आधारे प्रियांकाचा पत्ता मिळाला. फरीदाबाद मॉड्यूल आणि लाल किल्ला ब्लास्ट प्रकरणात आदिलला उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधून अटक करण्यात आली आहे.
Web Summary : Dr. Priyanka Sharma from Rohtak was detained in Anantnag for questioning related to the Delhi blast case. Her family denies any connection to Adil, stating she's pursuing her PhD in Jammu & Kashmir and they are cooperating with the investigation.
Web Summary : रोहतक की डॉ. प्रियंका शर्मा को दिल्ली ब्लास्ट मामले में पूछताछ के लिए अनंतनाग में हिरासत में लिया गया। परिवार ने आदिल से किसी भी संबंध से इनकार किया, कहा वह जम्मू-कश्मीर में पीएचडी कर रही हैं और जांच में सहयोग कर रहे हैं।