शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

'ट्रॅक्टर रॅली'साठी दिल्ली पोलिसांची परवानगी; सिंघु, टिकरी व गाझीपूर बॉर्डरवरून शेतकरी करणार एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2021 20:27 IST

ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना लिखित परवानगी मागितली होती.

नवी दिल्ली : कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलन आज ६० व्या दिवशीही सुरूच आहे. याच आंदोलनातंर्गत शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला म्हणजेच 'प्रजासत्ताक दिनी' ट्रॅक्टर रॅली काढून आपला निषेध नोंदविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. यासाठी शेतकरी संघटनांकडून तीन सीमांची (बॉर्डर) निश्चिती करण्यात आली आहे. 

शेतकऱ्यांच्या या ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली  आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीतील ३ ठिकाणी (सिंघु बॉर्डर, टिकरी बॉर्डर आणि गाझीपूर बॉर्डर) बॅरिकेट्स काढून काही किलोमीटरच्या आत येण्यास परवानगी देण्यात येणार आहे. दरम्यान, या ट्रॅक्टर रॅलीसाठी शेतकऱ्यांनी दिल्ली पोलिसांना लिखित परवानगी मागितली होती. 

"आज शेतकर्‍यांसोबत चांगली चर्चा झाली. संपूर्ण सन्माने ट्रॅक्टर रॅली करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर या तिन्ही ठिकाणांतील शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसाठी प्रवेश करू शकतील", असे दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितले.

याचबरोबर, शेतकऱ्यांच्या टॅक्टर रॅलीसाठी टिकरी बॉर्डवर ७ ते ८ हजार ट्रॅक्टर दाखल झाले आहेत, तर गाझीपूर बॉर्डवर १ हजार आणि सिंघू बॉर्डरवर 5 हजार ट्रॅक्टर पोहोचले आहेत. त्यामुळे सुरक्षितरित्या ट्रॅक्टर रॅली यशस्वी व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे, असेही दीपेंद्र पाठक म्हणाले.

अशी निघणार ट्रॅक्टर रॅली...सिंघु बॉर्डर: सिंघु सीमेवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली संजय गांधी ट्रान्सपोर्ट, कंझावला, बवाा, औचंदी बॉर्डरवरून हरियाणासाठी रवाना होईल.टिकरी बॉर्डर : टिकरी बॉर्डरवरून निघालेली ट्रॅक्टर रॅली नागलोई, नजफगढ, ढांसा, बादली या मार्गावरून केएमपी एक्सप्रेसवर जाईल.गाझीपूर यूपी गेट : ट्रॅक्टर रॅली गाझीपूर यूपी गेटहून अप्सरा बॉर्डर गाझियाबादमार्गे डासना यूपीमध्ये जाईल.  

टॅग्स :delhiदिल्लीFarmer strikeशेतकरी संप