शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

Delhi Violence : दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबर जारी; अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 8:59 PM

जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे

ठळक मुद्देजाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत.कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी जनतेनं 22829334 आणि 22829335 या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी.

नवी दिल्लीःनागरिकत्व सुधारणा विधेयकावरूनदिल्लीत हिंसाचार उफाळून आलेला आहे. दिल्लीतील आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. जाफराबाद, मौजपूर, चांद बाग, कारावाल नगर येथे संचारबंदी लागू करण्यात आली असून, दंगेखोरांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिल्ली पोलिसांना देण्यात आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं जनतेला आवाहन केलं आहे. तसेच दिल्ली पोलिसांकडून मदतीसाठी टेलिफोन नंबरही जारी करण्यात आले आहेत. कोणत्याही मदतीसाठी किंवा माहितीसाठी जनतेनं 22829334 आणि 22829335 या नंबरवर कॉल करून माहिती घ्यावी. अफवांकडे दुर्लक्ष करण्याचंही दिल्ली पोलिसांनी जनतेला आवाहन केलं आहे. आजची परिस्थिती नियंत्रणात असल्याचंही दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर नोंदवून घेतलेले असून, 106 जणांना अटक केली आहे. गैरवर्तणूक करणाऱ्यांची ओळख पटवली जात असून, आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आणि ठाम पुरावे आहेत. आज कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही, असंसुद्धा दिल्ली पोलिसांनी सांगितलं आहे.तत्पूर्वी पोलिसांनी पीडितांच्या कुटुंबीयांसाठी काही मोबाइल नंबर जारी केले होते. जिथे लोक आपले कुटुंबीय किंवा इतर स्थितीसंबंधी माहिती मिळवू शकतील. ANIच्या वृत्तानुसार, दिल्लीतल्या वेगवेगळ्या रुग्णालयांत पोलीस तैनात करण्यात आले असून, त्यांचे नंबरही जारी केलेले आहेत. गुरु तेग बहादूर रुग्णालयातून सब-इन्स्पेक्टर गजेंद्र सिंह यांच्याकडून माहिती मिळवता येत आहे. ज्यांचा मोबाइल नंबर 9818120026 आहे. लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयातूनही सब-इन्स्पेक्टर योगेंद्र सिंह माहिती देत आहेत. ज्यांचा मोबाइल नंबर 7982756328 आहे. मौलाना आझाद रुग्णालयातही 7982756328 या नंबरवर फोन केल्यावर सर्व माहिती उपलब्ध आहे. तिथे सब-इन्स्पेक्टर योगेंद्र सिंह तैनात आहेत. राम मनोहर लोहिया रुग्णालयातही सब-इन्स्पेक्टर देवेंद्र सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ज्यांचा मोबाइल नंबर 9818313342 आहे. अल हिंद रुग्णालयाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र राणा पीडितांशी संबंधित माहिती देत आहेत. त्यांचा मोबाइल नंबर 9868738042 आहे.    

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू

Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण  

Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली

Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'

Balakot Air Strike: बालाकोट एअर स्ट्राईकला वर्षपूर्ती, काय झालं होतं 'त्या' मध्यरात्री?; वाचा संपूर्ण कहाणी 

टॅग्स :delhi violenceदिल्लीPoliceपोलिसcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकDeathमृत्यू