Delhi MCD Election Results 2022: दिल्लीत बहुमत मिळालं नाही तरी भाजपा मानणार नाही हार, त्या प्लॅनवर काम करण्याचे नेत्यांना आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:42 PM2022-12-07T12:42:47+5:302022-12-07T12:43:50+5:30

Delhi MCD Election Results 2022: दिल्ली महानगरपालिकेच्या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या काही तासांमध्ये भाजपा आणि आपमध्ये कडवी टक्कर दिसून आली. मात्र नंतर आपने आघाडी घेत २५० जागा असलेल्या पालिकेमध्ये १२६ जागांचा बहुमताचा आकडा ओलांडला आहे.

Delhi MCD Election Results 2022: BJP will not accept defeat even if it does not get majority in Delhi, orders leaders to work on that plan | Delhi MCD Election Results 2022: दिल्लीत बहुमत मिळालं नाही तरी भाजपा मानणार नाही हार, त्या प्लॅनवर काम करण्याचे नेत्यांना आदेश 

Delhi MCD Election Results 2022: दिल्लीत बहुमत मिळालं नाही तरी भाजपा मानणार नाही हार, त्या प्लॅनवर काम करण्याचे नेत्यांना आदेश 

Next

नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. या मतमोजणीमध्ये सुरुवातीच्या काही तासांमध्ये भाजपा आणि आपमध्ये कडवी टक्कर दिसून आली. मात्र नंतर आपने आघाडी घेत २५० जागा असलेल्या पालिकेमध्ये १२६ जागांचा बहुमताचा आकडा ओलांडला आहे. जिंकलेल्या आणि आघाडीवर असलेल्या जागा मिळून आप १३२ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा १०४ जागांवर आघाडीवर आहे. मात्र दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमत न मिळाल्यास भाजपाने आपला प्लॅन बी तयार ठेवला असून, त्या परिस्थितीत भाजपाची नजर अपक्ष आणि इतर पक्षातील विजयी आमदारांवर असेल.

सूत्रांनी सांगितलं की, भाजपाच्या हायकमांडनी दिल्ली भाजपाच्या नेत्यांना अपक्ष आणि इतर पक्षाच्या विजयी नगरसेवकांशी संपर्क साधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजपा अपक्ष नगरसेवकांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आतापासूनच तयारीला लागला आहे. एवढंच नाही तर काँग्रेसच्या नगरसेवकांवरही भाजपाचा डोळा आहे.  आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार काँग्रेस ११ तर अपक्ष ३ जागांवर आघाडीवर आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार आपने ९८ जागांवर विजय मिळवला आहे. तर ३४ जागांवर आघाडी घेतलेली आहे. तर भाजपाने ८२ जागा जिंकल्या असून २२ जागांवर आघाडी घेतलेली आहे.

दिल्ली एमसीडीमध्ये २००७ पासून भाजपाची सत्ता आहे. २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाने २७० पैकी १८१ जागा जिंकल्या होत्या. तर आपने ४८  आणि काँग्रेसने ३० जागांवर विजय मिळवला होता. दरम्यान, या वर्षीच्या सुरुवातीला केंद्र सरकारने दिल्लीतील तीनही महानगरपालिकांचं एकत्रीकरण करून एकच महानगरपालिका स्थापन केली होती. तसेच वॉर्डची संख्या घटून २५० एवढी झाली होती.  

Web Title: Delhi MCD Election Results 2022: BJP will not accept defeat even if it does not get majority in Delhi, orders leaders to work on that plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.