शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019: सातही जागांवर भाजपाला आघाडी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 2:07 PM

दिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत.

ठळक मुद्देदिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 2 वाजेपर्यंत 3 लाख 25 हजार 327 मतांसह जवळपास दीड लाख मतांनी आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत आहे.

नवी दिल्ली - देशाची राजधानी असलेली दिल्ली काबीज करण्यासाठी सगळेच पक्ष प्रयत्नशील आहे. दिल्ली येथे लोकसभेच्या एकूण 7 जागा आहेत. या जागेवर मागील निवडणुकीत भाजपाने एकहाती कब्जा केला होता. त्यामुळे या जागांवर विजय मिळविण्यासाठी आप आणि काँग्रेस प्रयत्नशील आहेत. 2009 मध्ये सर्व जागांवर कब्जा करणाऱ्या काँग्रेसला 2014 मध्ये केवळ 15 टक्के मतांवरच समाधान मानावे लागले आणि काँग्रेसचा एकही उमेदवार त्या निवडणुकीत विजयी झाला नाही. 

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून दिल्लीत भाजपाने आघाडी घेतली आहे. सुरुवातीचा कल पाहता, 7 पैकी सातही जागांवर भाजपाचे उमेदवार आघाडीवर आहेत. क्रिकेटच्या मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या गौतम गंभीरने राजकारणाच्या मैदानावरही दमदार बॅटिंग केली. भाजपाच्या तिकिटावर पूर्व दिल्लीतून उभ्या राहिलेल्या गंभीरने 2 वाजेपर्यंत 3 लाख 25 हजार 327 मतांसह जवळपास दीड लाख मतांनी आघाडी घेतली आहे. 

 

दिल्लीमध्ये भाजप आणि आपची प्रतिष्ठा लागली पणाला, काँग्रेसच्या प्रबळ उमेदवारांमुळे लढतींमध्ये रंगत आहे. काँग्रेस व आप हे एकमेकांची किती मते ओढतात. यावरच भाजपाचे यश अवलंबून आहे. या निवडणुकीत काही जागा गमाविल्यास भाजपाला धक्का बसेल. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आपमध्ये आघाडीबाबत अनेकवेळा चर्चा झाल्या मात्र आघाडी फिस्कटल्याने अखेर काँग्रेस आणि आम आदमी पक्ष स्वतंत्र्यपणे दिल्ली लोकसभा निवडणूक लढवत आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपाकडून दावा करण्यात आला होता की, 'आप'चे सात आमदार आमच्या संपर्कात आहेत. तर भाजपाकडून आमचे आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप 'आप'कडून करण्यात आला होता. 

नवी दिल्ली

भाजपाच्या मीनाक्षी लेखी येथील खासदार आहेत. त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी आव्हान दिले आहे. तर आपने ब्रिजेश गोयल यांना उमेदवारी दिली आहे

चांदणी चौक 

चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत. 

पूर्व दिल्ली

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर दिल्ली पूर्व लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. त्याच्यासमोर आम आदमी पक्षाच्या आतिशी आणि काँग्रेसचे अरविंद सिंह लवली यांचे आव्हान आहे. 

पश्चिम दिल्ली

काँग्रेसने पश्चिम दिल्ली येथून महाबल मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपाने प्रवेश वर्मा यांच्यावर विश्वास दाखविला आहे. आपने बलबीरसिंग जाखड यांना उमेदवारी दिली आहे.

दक्षिण दिल्ली

काँग्रेसनं बॉक्सर विजेंदर सिंहला दक्षिण दिल्लीतून उमेदवारी दिली आहे. भाजपाने रमेश बिधुडी यांच्यावरच विश्वास व्यक्त केला आहे. आपने राघव चढ्ढा यांना उमेदवारी दिली आहे.  

उत्तर-पूर्व दिल्ली

उत्तर-पूर्व दिल्लीतील मतदार संघातून आपचे उमेदवार दिलीप पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्याविरोधात भाजपाचे उमेदवार मनोज तिवारी आणि काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्षा शीला दीक्षित निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत. 

उत्तर-पश्चिम दिल्ली

भाजपाने या मतदारसंघात पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने राजेश लिलोठिया यांना उमेदवारी दिली आहे. तर आपने गुग्गन सिंह यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :Delhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाGautam Gambhirगौतम गंभीरAAPआपcongressकाँग्रेस