शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! "या" विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला मिळणार नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2020 1:30 PM

Delhi Skill and Entrepreneurship University : विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे.

नवी दिल्ली - शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेकांना नोकरीची चिंता सतावत असते. विद्यार्थ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवीन विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली आहे. या विद्यापीठातून पास होणाऱ्या प्रत्येकाला नोकरी मिळणार आहे. Delhi Skill and Entrepreneurship University असं या विद्यापीठाचं नाव असून पुढच्या वर्षी ऑगस्ट महिन्यात या विद्यापीठातील अभ्यासक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. 

केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे. दिल्ली विधानसभेच्या विशेष अधिनियमानुसार या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.  "विद्यापीठाविषयी माहिती देताना खूप आनंद होत आहे. विद्यापीठाची पहिली बैठक पार पडली आहे. यामध्ये कुलपती आणि बोर्डाच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता" अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच प्रत्येकाला रोजगार मिळवून देणं हाच उद्देश आहे. तसंच नवीन व्यापार करण्यासाठी त्यांना सक्षम करणं हा देखील यामागील उद्देश आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश

सरकारने यासाठी आयआयएम-अहमदाबादमधील सेंटर फॉर इनोव्हेशन इनक्युबेशन अँड इंटररप्रेन्योरशिपच्या प्रमुख डॉ. निहारिका वोहरा यांची कुलपती म्हणून निवड केली आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाच्या बोर्ड सदस्यांमध्ये अनुभवी आणि यशस्वी व्यक्तींचा समावेश आहे. यामध्ये इंडियन स्कूल ऑफ बिझनेसचे संस्थापक डीन प्रमथ राज सिन्हा, जॅनपॅक्टचे संस्थापक प्रमोद भसीन, नोकरी डॉटकॉमचे संस्थापक संजीव बिखचंदानी, उद्योजक श्रीकांत शास्त्री आणि आयपी विद्यापीठाचे संस्थापक के. के. अग्रवाल यांचा समावेश आहे.

"प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश"

आम्ही विद्यापीठाचे कुलपती आणि बोर्डाच्या अन्य सदस्यांची नियुक्ती केली आहे. या विद्यापीठातून उत्तीर्ण होणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार देणं, त्यांना सक्षम करणं हा एकमेव उद्देश आहे. मी सर्वांशी याबाबत योग्य ती चर्चा केली आहे अशी माहिती केजरीवाल यांनी दिली आहे. तसेच या विद्यापीठामध्ये गुणवत्ता आणि योग्य शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. त्याचबरोबर अनेक कंपन्यांशी करारदेखील करण्यात येणार आहेत  अशी माहिती उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतची माहिती दिली आहे.  

टॅग्स :delhiदिल्लीuniversityविद्यापीठEducationशिक्षणjobनोकरीStudentविद्यार्थीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल