शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे उपमुख्यमंत्रिपदी मनीष सिसोदिया यांची वर्णी लागणार

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

आपच्या मंत्रिमंडळात चार नवे चेहरे : राखी बिर्ला, सोमनाथ भारतींना डच्चू?

आपच्या मंत्रिमंडळात चार नवे चेहरे : राखी बिर्ला, सोमनाथ भारतींना डच्चू?
नवी दिल्ली- दिल्लीत उद्या १४ फेब्रुवारीला सत्तारूढ होत असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांचे उपमुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित झाले आहे. याशिवाय यावेळच्या मंत्रिमंडळात चार नवे चेहरेही दिसण्याची शक्यता आहे.
आम आदमी पार्टीच्या सूत्रांनी गुरुवारी ही माहिती दिली. सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना वगळता आपच्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळातील सदस्य राखी बिर्ला, सौरभ भारद्वाज, सोमनाथ भारती आणि गिरीश सोनी यांना मात्र डच्चू मिळणार असल्याचे वृत्त आहे.
पक्षाने यावेळी जीतेंद्र तोमर (त्रिनगर), कपिल मिश्रा (कारवलनगर), संदीप कुमार (सुल्तानपुरी माजरा) आणि असिम अहमद खान (मतिया महल) यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे ठरविले आहे. खान यांच्या रूपात अल्पसंख्यकांना सरकारमध्ये प्रतिनिधित्व मिळेल. नवीन सरकारमध्ये बहुदा महिला सदस्य असणार नाही.
सिसोदिया यापूर्वीच्या आप सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते आणि शिक्षण, शहर विकास, सार्वजनिक बांधकाम आदी महत्त्वाची खाती त्यांनी सांभाळली होती. शाकुर बस्ती येथून दोनदा निवडून आलेले आणि यापूर्वीच्या सरकारमध्ये आरोग्य विभागाची धुरा सांभाळणारे जैन यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात सदस्य निवडीवरून पक्षात चर्चेचे गुऱ्हाळ सतत सुरू आहे. परंतु जोपर्यंत औपचारिक घोषणा होत नाही तोपर्यंत याबाबत काही वक्तव्य करणे योग्य ठरणार नाही, असे सिसोदिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. उपमुख्यमंत्रिपदी वर्णी लागणार असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता.
सूत्रांच्या सांगण्यानुसार बुधवारी रात्री केजरीवाल यांच्या कौशम्बी येथील निवासस्थानी झालेल्या आपच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत सिसोदिया यांना उपमुख्यमंत्री बनविण्याबाबत निर्णय झाला. केजरीवाल यांना राष्ट्रीय स्तरावर पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित करता यावे म्हणून सिसोदिया यांना ही जबाबदारी देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय विधानसभा अध्यक्षपदी शहाद्राचे आमदार रामनिवास गोयल आणि उपाध्यक्षपदी शालिमार बाग मतदारसंघातून विजयी झालेल्या वंदना कुमारी यांच्या निवडीचाही निर्णय या बैठकीत झाला. वंदनाकुमारी या आप महिला शाखेचेही नेतृत्व करतात. (वृत्तसंस्था)