दिल्ली आग: मृतांच्या कुटुंबीयांना भाजपकडून 5 तर केजरीवाल यांच्याकडून 10 लाखाची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 13:09 IST2019-12-08T13:05:31+5:302019-12-08T13:09:54+5:30

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट दिल्यांनतर जखमींची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात पोहचले आहे.

delhi cm arvind kejriwal rani jhansi road fire incident compensation bjp manoj tiwari dead injured | दिल्ली आग: मृतांच्या कुटुंबीयांना भाजपकडून 5 तर केजरीवाल यांच्याकडून 10 लाखाची मदत

दिल्ली आग: मृतांच्या कुटुंबीयांना भाजपकडून 5 तर केजरीवाल यांच्याकडून 10 लाखाची मदत

नवी दिल्ली -दिल्लीतील अनाज मंडी परिसरात झालेल्या भीषण अग्नितांडवात 43 जाणांचा बळी गेला आहे. पोलिस प्रशासन आणि अग्निशमन विभागाकडून बचावकार्य सुरू असून 56 हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्याचबरोबर या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट दिल्यांनतर जखमींची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात पोहचले आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. याशिवाय जखमींना 1 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली. त्याचबरोबर अरविंद केजरीवाल म्हणाले की, जखमींवर मोफत उपचार केले जातील.

याशिवाय दिल्लीचे भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारीही घटनास्थळी पोहोचले. मनोज तिवारी यांनी घटनेबद्दल दु: ख व्यक्त केले आणि मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपये देण्याची घोषणा केली. याशिवाय जखमींना 25 हजार रुपये देणार असल्याचे ते म्हणाले.

दिल्लीतील राणी झांशी रोडवरील अनाज मंडी परिसरात आज पहाटे हे भीषण अग्नितांडव घडले. या परिसरात असलेल्या एका तीन मजली बेकरीतील वरच्या मजल्यावर पहाटे पाच वाजता आग लागली. त्यानंतर ही आग संपूर्ण इमारतीत पसरली. हा भाग दाटीवाटीचा असल्याने मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत होते. तसेच ही आग आणि धुराचे लोळ आजुबाजूच्या इमारतीत पसरल्याने अनेकजण धुरामध्ये गुदरमले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

 

 

Web Title: delhi cm arvind kejriwal rani jhansi road fire incident compensation bjp manoj tiwari dead injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.