"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 14:17 IST2025-11-13T14:15:18+5:302025-11-13T14:17:03+5:30
Delhi Blast: "दिल्लीतील बॉम्बस्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ मान्य करण्यासाठी मोदी सरकारला 50 तास लागले."

"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
Delhi Blast: दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. शिवाय, राजकीय वातावरणही पेटले आहे. या घटनेवरुन विरोधक केंद्र सरकारवर प्रश्न उपस्थित करत आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट यांनी या घटनेवरुन सरकारवर कमकुवत प्रतिसाद दिल्याचा आरोप केला आहे.
देशाच्या सुरक्षेशी खेळ
काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, "दिल्लीतील बॉम्बस्फोटाला ‘दहशतवादी हल्ला’ मान्य करण्यासाठी मोदी सरकारला 50 तास लागले. पण पाकिस्तानवर एक शब्दही उच्चारला गेला नाही. पाकिस्तानशिवाय भारतात असा हल्ला शक्य आहे का?"
दिल्ली बम धमाकों के 50 घंटे बाद मोदी सरकार ने आख़िर स्वीकार किया कि यह एक 'आतंकवादी हमला' था
— Supriya Shrinate (@SupriyaShrinate) November 13, 2025
लेकिन पाकिस्तान पर एक शब्द नहीं बोला
क्या पाकिस्तान के बिना भारत में कोई आतंकवादी हमला हो सकता है?
पहलगाम आतंकी हमले के बाद मोदी सरकार ने कहा था कि किसी भी आतंकवादी हमले को युद्ध की… pic.twitter.com/myRaNPMxNx
"पहलगाम हल्ल्यानंतर मोदी सरकारने जाहीर केले होते की, कोणताही दहशतवादी हल्ला हा ‘युद्धासारखी कारवाई’ समजला जाईल, पण आता त्या विधानाचा विसर पडल्याचे दिसत आहे. नरेंद्र मोदी यांनी केवळ आपली प्रतिमा उभारण्यासाठी देशाच्या सुरक्षेशी खेळ केला का?" असा बोचरा प्रश्न त्यांनी विचारला.
इंटेलिजन्स कुठे होती?
यावेली श्रीनेत यांनी देशातील गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "या हल्ल्याची कोणतीही इंटेलिजन्स माहिती आधी का नव्हती? आयबी, दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह काय करत होते? देशाची सुरक्षा सुरक्षित हातात नाही. मोदी सरकार फक्त घोषणांपुरतेच मर्यादित आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.