Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 19:15 IST2025-11-19T19:15:05+5:302025-11-19T19:15:46+5:30
Delhi Blast : दिल्ली स्फोटात जखमी झालेल्यांपैकी काही लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

फोटो - nbt
दिल्लीस्फोटात जखमी झालेल्यांपैकी काही लोकांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. काही जण अजूनही एलएनजेपी येथे उपचार घेत आहेत. या हल्ल्यातून वाचलेल्या लोकांनी आता आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांना त्यांच्या कुटुंबाची काळजी वाटत आहे. एलएनजेपी येथे बेडवर जखमी अवस्थेत असलेल्या भवानी शंकर यांनी "मी एप-आधारित कॅब सेवेसाठी टॅक्सी चालवतो. माझी कार नवीन होती. मी फक्त पाच किंवा सहा हप्ते भरले होते. पण आता मला माहित नाही की माझी कार कुठे आहे किंवा ती कोणत्या स्थितीत आहे?"
भवानी शंकर यांना डिस्चार्ज देण्यात आलेला नाही. पुढचे १०-१५ दिवस ते काम करू शकत नाहीत. त्यामुळेच आपल्या कुटुंबाचं पोट कसं भरणार? याची त्यांना आता सर्वात मोठी चिंता वाटत आहे. त्यांच्या घरी त्यांची पत्नी, तीन मुलं आणि एक वृद्ध आई आहे. ते नोएडा येथे आपल्या कुटुंबासह राहतात. १० नोव्हेंबर रोजी ते एका प्रवाशाला घेण्यासाठी जात असताना लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये भीषण स्फोट झाला.
शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
नेपाळमध्ये खरेदी केले ७ सेकंड-हँड फोन, कानपूरमधून ६ सिमकार्ड; दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
"मला नोएडाचा एक ड्रॉप होता. मी त्याला घेण्यासाठी लाल किल्ल्यावर जात होतो. मला वाटलं की मी प्रवाशाला सोडून नंतर घरी जाईन. त्यानंतर जवळच उभ्या असलेल्या एका कारमध्ये स्फोट झाला, ज्यामुळे मी प्रवाशाला पिक करू शकलो नाही" असं भवानी शंकर यांनी सांगितलं. यामध्ये त्यांचा हात आणि चेहरा भाजला. त्याने त्याच्या पायांना आणि मणक्यालाही दुखापत झाली आहे.
दिल्ली स्फोटातील डॉ. शाहीनच्या कोट्यवधींच्या फंडिंगबाबत धक्कादायक खुलासा, ATS-NIA चे छापे
जैशने २० लाख पाठवले तरी डॉक्टर एकमेकांशी भिडले? दिल्ली स्फोटाबाबत धक्कादायक खुलासा
एलएनजेपीच्या बाहेर उभा असलेला जयवीर खूप अस्वस्थहोता. स्फोटात त्याच्या छातीला दुखापत झाली. उपचारानंतर त्याला अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मंगळवारी, तो त्याच्या एका कानाची तपासणी करण्यासाठी एलएनजेपी येथे आला. स्फोटाच्या आवाजामुळे त्याला एका कानाने ऐकू येत नाही. दिल्ली स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. नवभारत टाईम्सने याबाबतचे वृत्त दिले आहे.