लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

By बाळकृष्ण परब | Published: December 15, 2020 12:32 PM2020-12-15T12:32:11+5:302020-12-15T12:49:43+5:30

Karnataka News : आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला.

Defamation of Democracy: Fight in Karnataka Legislative Council, Speaker Pulled from Chair | लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

लोकशाहीला काळिमा : कर्नाटकच्या विधान परिषदेत हाणामारी, सभापतींना खुर्चीवरून खेचले

Next

बंगळुरू - सभागृहामध्ये गोंधळ, कागदपत्रे भिरकावणे हे गेल्या काही काळात देशातील संसदेपासून विधिमंडळांपर्यंत गेल्या काही काळात नित्याचेच बनले आहे. मात्र आज कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाहीला आणि संसदीय परंपरेला काळिमा फासणारा प्रकार घडला. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये झालेले मदतभेद हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यातच दोन्ही बाजूच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून उठवले.

 

आज घडलेल्या घटनेबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले की, भाजपा आणि जेडीएसने सभापतींना सभागृहाचे आदेश नसताना अवैधपणे खुर्चीवर बसवले. असे करून भाजपाने असंवैधानिक पाऊल उचलले. कॉंग्रेसने त्यांना खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. त्यानंतर आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.

Web Title: Defamation of Democracy: Fight in Karnataka Legislative Council, Speaker Pulled from Chair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.