लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 09:25 AM2021-02-09T09:25:32+5:302021-02-09T09:43:37+5:30

Deep Sidhu Arrested: प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे

Deep Sidhu, an accused in 26th January violence case arrested: Delhi Police Special Cell | लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला अटक

googlenewsNext

नवी दिल्ली - लाल किल्ल्यावरील हिंसक आंदोलनाप्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धूला (Deep Sidhu) अटक करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. हिंसाचारनंतर दीप सिद्धूचं नाव समोर आलं होतं. गेल्या 14 दिवसांपासून तो फरार झाला होता. यानंतर आता सिद्धूला अटक करण्यात दिल्ली पोलिसांना यश आलं आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दिल्ली बॉर्डरवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली मात्र यावेळी काही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. थेट लाल किल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी धर्मध्वज फडकवला, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप दीप सिद्धूवर ठेवण्यात आला आहे. दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार होते. या सर्वांच्या अटकेसाठी काही दिवसांपूर्वी दिल्ली पोलिसांनी बक्षीस जाहीर केलं होतं. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षीस मिळेल असं म्हटलं होतं.

लाल किल्ल्यावरील हिंसाचारातील आरोपी असणाऱ्या दीप सिद्धूच्या अटकेसाठी एक लाखाचं बक्षीस

दीप सिद्धूसह जुगराज सिंग, गुरजोत सिंग आणि गुरजंत सिंग यांच्या अटकेसाठी त्यांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाख रुपयाचं बक्षीस देण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या जाजबीर सिंग, बूटा सिंग, सुखदेव सिंग आणि इकबाल सिंघ यांच्या अटकेसाठी प्रत्येकी 50,000 रुपये रोख रक्कमेची घोषणा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी दीप सिद्धूचा एक व्हिडीओ समोर आला होता. यामध्ये त्याने भाजपा खासदार सनी देओल याच्यावर फसवणुकीचा आरोप केला होता. प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर काही हिंसक शेतकऱ्यांनी पोलिसांना मारहाण करत थेट आतमध्ये घुसले, याठिकाणी आंदोलकांनी साहिब निशान फडकवले होते. दीप सिद्धू याच्यावर शेतकरी नेत्यांनी आरोप केले होते.

दीप सिद्धूने व्हिडीओत सनी देओलने लोकांचा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आयुष्यातील 20 दिवस सनी देओल माझा भाऊ आहे म्हणून प्रचार केला, भाजपासाठी मतदान मागितलं नव्हतं, मी आरएसएस, भाजपाचा माणूस आहे असं सांगितलं जात आहे, सनी देओल सोशल मीडियात पोस्टवर पोस्ट करत आहेत असं सांगितलं होतं. मी पंजाब आणि येथील लोकांचा आवाज उठवला, पण माझ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला. मला या गोष्टीची पर्वा नाही की सरकार काय म्हणतं, लोक काय म्हणतात त्यामुळे मी दुखी आहे, बिहारी मजुरांसह शेतात राहिल्याचं दीप सिद्धूने सांगितलं होतं. तर ही माणसं मला साथ देतात म्हणून मी त्यांच्यामध्ये राहत आहे, जर मी सरकारचा माणूस असतो तर लग्झरी हॉटेलमध्ये मजेत राहिलो असतो असं त्याने सांगितलं होतं. 

 

Read in English

Web Title: Deep Sidhu, an accused in 26th January violence case arrested: Delhi Police Special Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.