काम करत असतानाच मृत्यूने गाठले! इमारतीची भिंत कोसळली ७ जणांचा मृत्यू, मध्यरात्री घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 12:15 IST2026-03-10T12:14:23+5:302026-03-10T12:15:43+5:30

बांधकाम सुरू असतानाच भिंत कोसळून सात मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. 

Death while working! Building wall collapses, 7 dead, incident takes place at midnight | काम करत असतानाच मृत्यूने गाठले! इमारतीची भिंत कोसळली ७ जणांचा मृत्यू, मध्यरात्री घडली घटना

काम करत असतानाच मृत्यूने गाठले! इमारतीची भिंत कोसळली ७ जणांचा मृत्यू, मध्यरात्री घडली घटना

एका उच्चभ्रू सोसायटीचे बांधकाम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत सहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गुरुग्राममधील सिधरावली परिसरात मध्यरात्री ही घटना घडली. एका बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरू होते. त्याचवेळी भिंत कोसळली. काम करत असलेले मजूर भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले. त्यात सात जणांचा मृत्यू झाला, तर चार जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार काम सुरू असतानाच भिंत कोसळली. अनेक मजुर ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर मदत कार्य सुरू झाले. ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्या मजुरांपैकी ७ जणांचा मृत्यू झाला, तर चार जणांवर उपचार सुरू आहेत. 

मोठा आवाज झाला अन्...

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. इमारतीचे काम सुरू होते. काही मजूर काम करत होते, तर काही आराम करत होते. त्याचवेळी एक मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात भिंत कोसळली. 

पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्याचबरोबर जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफच्या पथकालाही बोलावण्यात आले. शोध कार्य आणि मदत मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली. मशिन्सच्या मदतीने अनेक तासांनंतर मातीचा ढिगारा हटवण्यात यश आले. त्यानंतर मजुरांचे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. 

मातीच्या ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्यांपैकी सात मजुरांचा जागेवरच मृत्यू झाला होता. चार जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. 

Web Title : निर्माण स्थल पर दीवार गिरने से सात मजदूरों की मौत

Web Summary : गुरुग्राम में एक निर्माण स्थल पर दीवार गिरने से सात मजदूरों की मौत हो गई और चार घायल हो गए। घटना रात में हुई, जिसमें मजदूर मलबे के नीचे दब गए। बचाव कार्य जारी है।

Web Title : Wall Collapse at Construction Site Kills Seven Workers

Web Summary : Seven workers died and four were injured after a wall collapsed at a Gurugram construction site. The incident occurred at night, trapping laborers under debris. Rescue efforts are underway.