शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

केश प्रत्यारोपणानंतर विद्यार्थ्याचा मृत्यू

By admin | Updated: June 10, 2016 04:08 IST

२२ वर्षीय संतोषचा केश प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर (हेअर ट्रान्सप्लान्ट) दोनच दिवसांत मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

चेन्नई : वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी २२ वर्षीय संतोषचा केश प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर (हेअर ट्रान्सप्लान्ट) दोनच दिवसांत मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या महिन्यात त्याच्यावर एका स्थानिक हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरमध्ये केश प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर तापामुळे गुंतागुंत निर्माण होऊन मृत्यू ओढावला.त्याच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सर्जन नसल्याचा आरोप करीत त्याच्या पालकांनी अटकेची मागणी केल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत या केंद्राला सील ठोकले आहे. या केंद्रातील दोन डॉक्टर पसार झाले असून, त्यांचा शोध घेतला जात आहे.आपल्या डोक्यावर थोडे टक्कल असल्यामुळे संतोषला मित्रांमध्ये वावरताना लाज वाटायची. त्यामुळे त्याने केस येण्यासाठी शस्त्रक्रिया करवून घेतली.त्याच्या डोक्यावर १२०० केस प्रत्यारोपित करण्यासाठी दहा तासांची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्याला अचानक ताप आला. त्यानंतर, त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, दोनच दिवसांत त्याच्यावर मृत्यूने झडप घातली. मुलाचा मृत्यू हताशपणे पाहण्याची वेळ आलेली त्याची आई पी. जोसेफिन या परिचारिका असून, संतोष हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. भूलतज्ज्ञ(अ‍ॅनेस्थेटिस्ट) शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी इंजेक्शन देऊन निघून गेला. संतोषच्या हेअर ट्रान्सप्लांटसाठी डॉक्टरांनी तब्बल ७३ हजार रुपये घेतले होते. (वृत्तसंस्था)>मुदत संपलेला सलूनचा परवाना...पसार झालेल्या डॉक्टरांनी हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरसाठी नव्हे, तर सलूनसाठी परवाना घेतला होता. तो परवानाही दोन महिन्यांपूर्वीच संपला होता. दोन्ही डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी असून, एकाने चीनमधून प्रशिक्षण घेतले असले, तरी त्यांच्याकडे रुग्णाच्या शरीरात गुंतागुंत निर्माण झाल्यास इलाजासाठी पायाभूत सुविधा नव्हत्या.आॅपरेशन थिएटरमध्ये निर्जंतूक अशी जागाही नव्हती, असे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तपासाअंती म्हटले आहे. हेअर ट्रान्सप्लान्ट सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात औषधांचा साठा आढळून आला. मात्र, त्यासाठी आवश्यक परवाना नसल्याची माहिती औषध नियंत्रकाने दिली आहे.बेपत्ता झालेले दोन डॉक्टर नियमितपणे ५० ते ६० लाख रुपयांची कमाई करतात. त्यांच्यासाठी केवळ पैसा महत्त्वाचा असून, एखाद्याच्या जिवाची काहीही किंमत नाही. अवघ्या काही तासांत मी माझा मुलगा गमावला. ते इतरांबाबत घडू नये. आम्हाला तर न्याय हवाच आहे. - जोसेफिन, मृत संतोषची आई