शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 18:19 IST

Scam on Date: एका डेटिंग अ‍ॅपवरून या पीडित तरुणाला तरुणी सापडलेली असते. तिच्याशी चॅट करत करत कॅफेमध्ये भेटण्याचे ठरते. हा प्रकार परदेशात नाही तर दिल्लीत घडला आहे.

डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली...

डेटिंग अ‍ॅपवरून फसल्यावर युजर आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर करत असतात. तरी देखील लोक या पोस्ट वाचूनही फसत असतात. डेटिंग अॅपद्वारे एका तरुणीसोबत डेटवर गेलेल्या तरुणासोबत अशीच फसवणूक झाली आहे. त्याने रेडीटवर याची माहिती दिली आहे. ही घटना परदेशात नाही तर दिल्लीतील लोकस कॅफेतील आहे. 

एका डेटिंग अ‍ॅपवरून या पीडित तरुणाला तरुणी सापडलेली असते. तिच्याशी चॅट करत करत कॅफेमध्ये भेटण्याचे ठरते. लोकस कॅफेत गेल्यावर तरुणी एकामागोमाग एक ऑर्डर देत सुटते. या तरुणाकडे तेवढे पैसे नसतात, त्याच्याकडे तीनच हजार रुपये आहेत असे तो सांगतो. आपण दोघांनी मिळून हे बिल निम्मे निम्मे भरु असे तो तिला सांगतो. हे ऐकून ती तरुणी आणखी ऑर्डर करायला सुरु करते. बिल कधी १२००० वर पोहोचते हे या तरुणालाही समजत नाही. 

या तरुणीचे नाव भूमी आहे, असे या तरुणाने सांगितले आहे. येगर बॉम्ब्सची तीने पहिली ऑर्डर दिली होती. त्याची प्रत्येकी बॉम्ब्सची किंमत १२०० रुपये आहे हे पाहून त्याला टेन्शन आले. त्याने आपल्याकडे एवढे पैसे नाहीत असे तिला सांगितले. माझ्याकडे फक्त ३ हजार आहेत जे मला एक किंवा दोन जेवणासाठी पुरेसे आहेत, असे या तरुणाने तिला सांगितले. तिने ऑर्डरवर ऑर्डर दिल्या आणि नंतर बिला मागविले. तिने चांगले ११९५८ रुपयांचे बिल केले होते. सगळे खाऊन-पिऊन झाल्यावर तिने तिच्याकडे फक्त १०० रुपयेच असल्याचे सांगितले, हे ऐकून त्या तरुणाच्या पायाखालची जमिनच सरकली. 

अडचणीत सापडल्यावर या तरुणाने कॅफेतील कर्मचाऱ्यांना बिल निम्मे निम्मे करण्यास सांगितले. त्यांनी नकार दिला. या बोलण्यात त्या भूमीने तेथून पोबारा देखील केला. कॅफेची ओनर वर्षा नावाची महिला होती. तिला त्याने भूमीला रोखण्यास आणि तिच्याकडून बिल घेण्यास सांगितले. परंतू तिने ती मुलगी आहे आम्ही तिला थांबवू शकत नाही असे सांगत या तरुणालाच बिल भरण्यास सांगितले. दोन तास कॅफेत थांबल्यावर त्याने मित्रांना बोलवून बिल भरले. 

टॅग्स :relationshipरिलेशनशिपfraudधोकेबाजी