शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

दुर्दैवी! दलित विद्यार्थ्यांना तबेल्यात बसून ऐकावी लागली मोदींची 'परीक्षा पर चर्चा'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:28 AM

शिमला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणतणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमाच्या नुकतेच मार्गदर्शन केले होते. देशभरात या उपक्रमाचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या शाळेतील दलित विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे बसवण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. कुलू येथील चेष्ठा ...

शिमला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणतणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमाच्या नुकतेच मार्गदर्शन केले होते. देशभरात या उपक्रमाचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या शाळेतील दलित विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे बसवण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. कुलू येथील चेष्ठा ग्रामपंचायतीच्या शाळेत हा प्रकार घडला. मोदींच्या 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांचे घर निवडण्यात आले होते. मात्र, शाळेचे विद्यार्थी याठिकाणी आले तेव्हा दलित विद्यार्थ्यांना टीव्ही ठेवलेल्या खोलीबाहेर बसायला सांगण्यात आले. याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारदारांपैकी एक असलेल्या मेहर चंद या विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही कार्यक्रम बघायला शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांच्या घरी गेलो तेव्हा दलित विद्यार्थ्यांना टीव्ही असलेल्या खोलीच्या बसायला सांगितले. ही खोली घोड्यांसाठी वापरली जात होती. तसेच आम्हाला कार्यक्रम सुरू असताना मधूनच उठून न जाण्याविषयी बजावण्यात आले होते, असेही मेहर चंद याने सांगितले. दलित विद्यार्थ्यांनी वहीच्या एका पानावर आपली तक्रार पोलिसांना लिहून दिली. यामध्ये त्यांनी आपल्याला माध्यान्ह भोजनाच्यावेळीही इतरांपासून वेगळे बसवले जात असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार उघड आल्यानंतर एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने चेष्ठी शाळेचे प्राचार्य राजन भारद्वाज आणि शाळेचे उपसंचालक जगदीश पठाणिया यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीStudentविद्यार्थीSchoolशाळा