वेदानुसारच दादरीतील हत्या - संघ

By Admin | Updated: October 18, 2015 09:18 IST2015-10-18T09:18:03+5:302015-10-18T09:18:03+5:30

उत्तरप्रदेशमधील दादरी हत्याप्ररणाचा देशभरातून विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या घटनेचे समर्थन केले आहे.

Dadakrite murder - Sangh | वेदानुसारच दादरीतील हत्या - संघ

वेदानुसारच दादरीतील हत्या - संघ

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १८ -  घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरुन उत्तरप्रदेशमधील दादरी येथे जमावाने एका मुस्लिम व्यक्ती हत्या केल्याच्या घटनेचा देशभरातून विरोध होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र या घटनेचे समर्थन केले आहे. गोहत्या करणारा हा पापी असून वेदामध्येही अशा पापींना ठार मारा असा आदेश दिल्याचे निदर्शनास आणून देत संघाने या हत्येची पाठराखण केली आहे. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या पांचजन्यमध्ये दादरी हत्याकांडावर भाष्य करण्यात आले आहे. भारतातील मदरशांमध्ये मुस्लिम तरुणांमध्ये देशाच्या संस्कृतीविषयी व्देषभावना निर्माण केली जाते. दादरीतील अखलाकनेही याच भावनेतून गाईची हत्या केली असावी, याचे प्रायश्चित त्याला मिळाले असे या लेखात म्हटले आहे. गोहत्या करणा-याचे प्राण घ्या असे वेदात म्हटले असून आपल्यासाठी हा जीवनमरणाचा प्रश्न आहे असेही यात नमूद करण्यात आले आहे.

संघाच्या मुखपत्रातून  दादरी हत्याकांडाचे समर्थन करण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

Web Title: Dadakrite murder - Sangh