Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 05:24 PM2020-05-25T17:24:18+5:302020-05-25T17:35:19+5:30

उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ (१) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे.

Curfew Extend: Curfew extended till June 30 in these two districts of the state vrd | Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

Curfew Extend: 'या' राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये ३० जूनपर्यंत वाढवला कर्फ्यू

Next

हमीरपूर/सोलन- हिमाचल प्रदेश सरकारने जिल्हा दंडाधिकारी कलम १४४ अन्वये दोन जिल्ह्यांतील कर्फ्यू ३० जूनपर्यंत वाढवला आहे. सोलन व हमीरपूर जिल्ह्यातील डीसींनी कर्फ्यू वाढवत असल्याची घोषणा केली आहे. उपायुक्त सोलन के. सी. चमन यांनी फौजदारी दंड संहितेच्या कलम १४४ (१) अन्वये देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करत जिल्ह्यात 24 मार्च रोजी जाहीर केलेल्या कर्फ्यूचा कालावधी 30 जूनपर्यंत वाढवला आहे.

या आदेशानुसार, सोलन जिल्ह्यात कर्फ्यूमध्ये सकाळी आठ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सूट मिळणार आहे. संध्याकाळी 07 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजेपर्यंत आवश्यक सेवावगळता इतर व्यक्तींना बाहेर येण्यास बंदी राहणार आहे. या आदेशांची तातडीने अंमलबजावणी करण्यात येणार असून, 30 जूनपर्यंत ते लागू राहतील. हमीरपूर जिल्ह्यात न्यायदंडाधिकारी हरिकेश मीणा यांनी 30 जूनपर्यंत कर्फ्यू वाढविला आहे. कोरोना महामारीमुळे प्रशासनाने कर्फ्यू वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा

देशातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये मोदी, योगी अन् नितीश; राहुल, रामदेव पिछाडीवर

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

Web Title: Curfew Extend: Curfew extended till June 30 in these two districts of the state vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.