हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 03:45 PM2020-05-25T15:45:04+5:302020-05-25T16:13:06+5:30

हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे. 

giant tectonic plate in indian ocean is breaking in 2 parts says a new study vrd | हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

हिंदी महासागरातील विशाल टेक्टॉनिक प्लेट होताहेत विभक्त; नव्या संशोधनानुसार खुलासा

Next

नवी दिल्लीः हिंदी महासागराखालील विशाल टेक्टॉनिक प्लेट फुटणार असल्याची धक्कादायक माहिती नव्या अभ्यासातून समोर आली आहे. ही प्लेट येत्या काळात आपोआप दोन भागांत विभागली जाणार आहे. या प्लेटला भारत-ऑस्ट्रेलिया-मकर टेक्टोनिक प्लेट म्हणून ओळखले जाते. ही प्लेट अगदी हळूहळू विभक्त होत आहे, म्हणजेच एका वर्षात ही प्लेट 0.06 इंच (1.7 मिलीमीटर)ने विभक्त होत आहे.

लाइव्ह सायन्सच्या अहवालानुसार, या अभ्यासाचे संशोधक ओरेली कोडुरियर यांनी सांगितले की, ही एक अशी रचना नाही जी वेगवान वाटचाल करत आहे. ही प्लेट हळूहळू विभक्त होत असल्याचं प्रारंभी संशोधकांना समजलं नव्हतं, परंतु नंतर त्याचा सुगावा लागला. हिंदी महासागरामध्ये एका दोन भयंकर भूकंप झाल्यानंतर पाण्याखाली काही हालचाल झाल्याचंही संशोधकांनी सांगितलं आहे. 

11 एप्रिल 2012ला हिंदी महासागरातील इंडोनेशियाजवळ 8.6 आणि 8.2 अशा तीव्रतेचे दोन भूकंप झाले. हे भूकंप टेक्टोनिकल प्लेटच्या आसपास नव्हते, परंतु या प्लेटच्या मध्यभागी असलेल्या एका वेगळ्या ठिकाणावर त्यांचं केंद्रबिंदू दाखवलं होतं. या भूकंपानंतर संशोधकांना असे वाटले की. पाण्याखाली काही हालचाल आहे. ऑरेली कोडुरियर म्हणाले की, "हे एक कोड्यासारखे आहे, कारण ते एकसारख्या प्लेट नसून तीन एकत्रित आहेत, ज्या जोडलेल्या आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार या प्लेट्स विभक्त होण्यासाठी कोट्यवधी वर्षे लागतील. हा अभ्यास 11 मार्च रोजी जिओफिजिकल रिसर्च लेटर्स जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे.

हेही वाचा

CoronaVirus News :अशोक चव्हाण उपचारांसाठी मुंबईकडे; अ‍ॅम्ब्युलन्स निघतानाचा व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News : चीनमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना; आरोग्य यंत्रणेचे धाबे दणाणले

CoronaVirus News : धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये ढील दिल्यानं आठवड्याभरात वाढले 3500 रुग्ण, केजरीवालांची कबुली

CoronaVirus News: ब्रिटनमध्ये सप्टेंबर अन् अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये संपणार कोरोनाचा प्रभाव, अभ्यासात खुलासा

भारताची डोकेदुखी आणखी वाढणार; नेपाळ सीमेवर रस्ता तयार करणार 

Coronavirus: कोणत्याही देशाला जमलं नाही 'ते' चीननं करून 'दाखवलं'; उचललं मोठं पाऊल

मोदी सरकारनं तैवानच्या राष्ट्रपतींना दिला पाठिंबा अन् शुभेच्छा, चीन संतापला

Web Title: giant tectonic plate in indian ocean is breaking in 2 parts says a new study vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.