शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

साहित्याच्या ‘महा-कुंभा’तला सांस्कृतिक दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 8:34 PM

अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... - कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!

- अपर्णा वेलणकरडिग्गी पैलेस, जयपूर -  भारतासह एकूण तीस देशातून आलेल्या पाचशेहून अधिक वक्त्यांची सत्रे, पंधरा भारतीय आणि तब्बल बारा आंतरराष्ट्रीय भाषांचे प्रतिनिधित्व, वक्त्यांमध्ये नोबेल-पुलीत्झर-मैन बुकर अशा मानाच्या पुरस्कार विजेत्यांना प्रत्यक्ष ऐकण्या-भेटण्याची संधी, पर्यावरणापासून कालिदासाच्या काव्यापर्यंत आणि कृत्रिम बुध्दीमत्तेच्या उदयापासून संकुचित होत चाललेल्या जागतिक वातावरणातल्या लोकशाही-अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या भविष्यापर्यंत अक्षरश: अगणित विषयांवरल्या चर्चांची रेलचेल, समांतर चाललेले नृत्य-संगीत-वादनाचे कार्यक्रम आणि फक्त पाच दिवसात तब्बल पाच लाखाहून अधिक श्रोत्यांच्या लगबगीने भरून वाहणारे उसळते मंडप... कुणाही विचारी मनाला थक्क करणारे आणि दिलासा देणारे हे चित्र आहे जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलचे!मराठी साहित्य संमेलनाच्या किडुकमिडुक संसाराची रडगाणी ऐकून किटलेले कान संपन्नतेच्या अभिजात स्वरांनी बहरून टाकणाऱ्या जयपूर लिट-फेस्टचे गुरुवारी सकाळी डिग्गी पैलेसच्या वैभवसंपन्न आवारात उद्घाटन झाले. भारतीय साहित्य सृष्टीला जागतिक स्तरावर सन्मानाचे स्थान मिळवून देणार्या या ‘साहित्य-कुंभा’चे हे बारावे वर्ष आहे.ोचर्या गुलाबी थंडीत जयपूरच्या डिग्गी कुटुंबियांच्या विस्तीर्ण राजवाड्याचे प्रांगण हे या साहित्य-कुंभाचे घर! आणि सर्वत्र उभ्या वृक्षांच्या रांगांंमधून वाट काढत आपापल्या आवडीच्या सत्रांची ठिकाणे शोधत जाणारे रसिकांचे घोळके ही इथली चहलपहल!- इथे बड्या कंपन्यांनी स्वत:हून ओतलेला प्रायोजकत्वाचा पैसा आहे, त्याच्या उत्तम विनियोगाची दृष्टी आहे, राजकीय पुढार्यांना अतिरेकी महत्व देण्याची कारणे नाहीत... आणि मुख्य म्हणजे उत्साहाने सळसळणार्या साहित्य प्रेमींची अलोट गर्दी आहे!

टॅग्स :Indiaभारत