Crisis again in the land of God Kerala; 5 dead, 80 trapped in landslide | Video: केरळच्या प्रसिद्ध मुन्नार टेकडीवर भूस्खलन; 5 मृत; 80 जण ढिगाऱ्याखाली

Video: केरळच्या प्रसिद्ध मुन्नार टेकडीवर भूस्खलन; 5 मृत; 80 जण ढिगाऱ्याखाली

केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील राजमाला भागात मुन्नार टेकडीवर आज मोठी दुर्घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती आहे. अशातच आज एक मोठा डोंगर लोकवस्तीवर कोसळल्याने 5 जणांचा मृत्यू तर 80 जण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. 


घटनास्थळी मदतकार्य सुरु झाले असून 15 अॅम्बुलन्सही पोहोचल्या आहेत. या घटनेत आतापर्यंत 5 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर 10 जणांना जखमीअवस्थेत वाचविण्यात आले आहे. केरळचे मुख्यमंत्री विजयन यांनी भारतीय हवाई दलाला मदतीची विनंती केली आहे. 
केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, एक मोबाईल मेडिकल टीम आणि 15 अँम्बुलन्स पाठविण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना वाचविण्यासाठी एनडीआरएफसोबत अग्निशमन दल आणि पोलीस जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 
केरळच्या उत्तर भागात घरेच्या घरे पाण्याखाली गेली असून वायनाड आणि इडुकी जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेलियार नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने निलांबूर शहरात पूर आला आहे. तर उद्या मलप्पुरम जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.  

अन्य महत्वाच्या बातम्या...

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Crisis again in the land of God Kerala; 5 dead, 80 trapped in landslide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.