नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 12:35 PM2020-08-07T12:35:51+5:302020-08-07T12:38:21+5:30

दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते.

The brutal murder of four members of the family in nashik | नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

नाशिक हादरले! एकाच कुटुंबातील चौघांची निघृण हत्या; दोन लहान मुलांचाही समावेश

googlenewsNext

नांदगाव (नाशिक)-तालुक्यातील वाखारी ता.नांदगाव जवळील जेउर रस्त्याच्या लगत कुटुंबातील पती पत्नी व दोघा लहान मुलांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या हत्याकांडामुळे नांदगाव तालुका हादरला आहे.


समाधान आण्णा चव्हाण( ३७) भरताबाई चव्हाण  (३२) गणेश समाधान (६)आरोही समाधान चव्हाण( ४) अशा एकाच कुटुंबातील ही हत्या करण्यात आल्याने अख्खा तालुका हादरला आहे. पहाटेच रिक्षा चालक समाधान चव्हाण त्याची पत्नी मुलगा मुलगी रक्ताच्या थारोळ्यात दिसले. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे, पोलीस घटनास्थळी पोहचले असून याचा अधिक तपास करत आहेत.


दरोडेखोर की मनोविकृत ? अशी चर्चा सध्या आहे. सर्वसाधारण कुटुंबातील चौघे रात्री मळ्यातल्या घरातल्या ओसरीत झोपलेले होते. रक्ताच्या थारोळ्यात चौघांचे मृतदेह आढळून आल्यानै मोठी खळबळ उडाली. समाधान रिक्षा चालवित असे पण लाँकडाऊनमुळे तोही घरीच होता.बायको भरताबाई मोलमजूरी करीत असे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

नवी सुविधा! बिना इंटरनेट पैसे पाठविता येणार; RBI ची घोषणा

मॉडेलिंग सोडून UPSC दिली; ऐश्वर्या श्योराण पहिल्याच फटक्यात IAS बनली

‘सुसाईड नोट’मध्ये अर्णब गोस्वामीचे नाव, कारवाई करा; शिवसेना आमदाराचे गृहमंत्र्यांना पत्र

Marathi Joke: कोरोना, कुठे फेडशील रे हे पाप??

सिनेसृष्टी हादरली! एकाच दिवसात दुसरी आत्महत्या; अभिनेत्री अनुपमा पाठकने जीवन संपवले

आजचे राशीभविष्य - 7 ऑगस्ट 2020; वृश्चिक राशीचा वस्त्र, दागीने व सौंदर्य प्रसाधनांवर खर्च

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

Web Title: The brutal murder of four members of the family in nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.