२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 13:02 IST2025-06-08T13:01:03+5:302025-06-08T13:02:40+5:30

नितीन त्याचे काका समय सिंह आणि बलराम यांच्यासोबत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. याच काळात काका समय सिंहसोबत त्याची जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

Crime News Nephew takes extreme step by writing 23 page love letter! He said, "Uncle, I love you, I can't live without you..." | २३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

प्रेमात माणूस काहीही करायला तयार होतो. जयपूरमध्ये एका २८ वर्षीय तरुणाने अशाच काही कारणामुळे आत्महत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र, जेव्हा मृताच्या भावाला २३ पानांची सुसाईड नोट मिळाली, तेव्हा या प्रकरणात एक अनपेक्षित ट्विस्ट तेव्हा आला. या नोटमध्ये मृताने त्याच्या काकासोबत असलेल्या प्रेमसंबंधांचा आणि शारीरिक संबंधांचा उल्लेख केला आहे. या नोटनंतर मृताच्या भावाने त्याच्या काका आणि आणखी एका व्यक्तीविरुद्ध आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

जयपूरमध्ये प्रेमसंबंधातून तरुणाची आत्महत्या
दौसा येथील रहिवासी असलेला २८ वर्षीय नितीन जयपूरच्या जालुपुरा भागात नोकरीच्या शोधात आला होता. त्याला एका सिक्युरिट कंपनीत नोकरी मिळाली आणि तो त्याचे काका समय सिंह आणि बलराम यांच्यासोबत एका भाड्याच्या खोलीत राहत होता. याच काळात नितीन आणि त्याचे काका समय सिंह यांच्यात जवळीक वाढली आणि त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.

गेल्या काही दिवसांपासून नितीन मानसिक तणावात होता. १५ मे रोजी त्याची तब्येत अचानक बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेला आत्महत्या म्हटले आहे. नितीनच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह दौसा येथे नेऊन त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

२३ पानांची सुसाईड नोट आणि धक्कादायक खुलासे
नितीनच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी, म्हणजेच २५ मे रोजी, त्याचा भाऊ जयपूरला नितीनच्या खोलीत सामान घेण्यासाठी आला. कपाटातून सामान काढत असताना त्याला २३ पानांची एक सुसाईड नोट सापडली. या नोटने संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण दिले.

या सुसाईड नोटमध्ये नितीनने त्याच्या काका समय सिंहबद्दल धक्कादायक गोष्टी लिहिल्या होत्या. त्यात त्याने म्हटले होते, "काका, मी तुमच्यावर प्रेम करतो, मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. तुम्ही माझ्या शरीराच्या प्रत्येक कणाकणात आहात, प्रेम फक्त एकदाच होते, मग ते मुलीवर असो वा मुलावर..." नितीनने देवी लक्ष्मीला प्रार्थना केली होती की, तिने काका समय सिंहवर नेहमी प्रसन्न राहावं आणि त्याला समृद्ध करावं.

काका आणि मित्रावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप
ही सुसाईड नोट मिळाल्यानंतर नितीनच्या भावाने समय सिंह आणि बलराम सिंह या दोघांविरुद्ध नितीनला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. समय सिंह आणि बलराम सिंह यांनी नितीनच्या निरागसतेचा फायदा घेतला आणि त्याच्याशी अनैतिक कृत्य केले, ज्यामुळे नितीनने तणावात येऊन आत्महत्या केली, असा आरोप त्याच्या भावाने केला आहे.

पोलिसांनी म्हटले की, सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सुसाईड नोट नितीननेच लिहिली आहे का, याची खात्री केली जात आहे आणि या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Crime News Nephew takes extreme step by writing 23 page love letter! He said, "Uncle, I love you, I can't live without you..."

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.