धक्कादायक! वडिलांनी आपल्याच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; डोळेही काढण्याचा प्रयत्नही केला; व्हिडीओ आईला पाठवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:40 IST2026-01-30T13:28:35+5:302026-01-30T13:40:53+5:30

दिल्लीतील शास्त्री पार्क परिसरात एक भयानक घटना घडली आहे. एका वडिलांनी आपल्या ११ वर्षांच्या सावत्र मुलाची हत्या केली आहे. निष्पाप मुलाला छळ करून ठार मारण्यात आले.

crime news Father kills his own 12-year-old son; tries to gouge out his eyes; sends video to mother | धक्कादायक! वडिलांनी आपल्याच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; डोळेही काढण्याचा प्रयत्नही केला; व्हिडीओ आईला पाठवला

धक्कादायक! वडिलांनी आपल्याच १२ वर्षांच्या मुलाची केली हत्या; डोळेही काढण्याचा प्रयत्नही केला; व्हिडीओ आईला पाठवला

दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, वडिलांनी आपल्या ११ वर्षांच्या सावत्र मुलाची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. आरोपीने क्रुरतेचा कळस गाठला, मुलाचे डोळे काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हत्येनंतर त्याने मुलाच्या आईला आणि इतरांना स्वतः माहिती दिली आणि पुरावा म्हणून फोटो आणि व्हिडीओ देखील पाठवले. या धक्कादायक घटनेने दिल्लीत खळबळ उडाली आहे.

हुंड्यासाठी सुनेला जिवंत जाळली! निर्दयी सासूला जन्मठेप; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९.५० वाजता शास्त्री पार्क पोलिस स्टेशनला एका मुलाच्या हत्येची तक्रार मिळाली. शास्त्री पार्क चौक लूपजवळ पोहोचल्यावर, अंदाजे १२ वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला ताबडतोब जेपीसी रुग्णालयात नेण्यात आले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी शास्त्री पार्क पोलिस स्टेशनमध्ये आयपीसीच्या कलम १०३ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. फॉरेन्सिक टीमने गुन्ह्याच्या ठिकाणी तपासणी केली आणि पुरावे गोळा केले.

आरोपी वाजिद खान याला पोलिस कोठडीत घेण्यात आले आहे. त्याची चौकशी सुरू आहे. वाजिदने त्याचा मुलगा अल्तमस याला मारले आणि जंगलात फेकून दिले. त्यानंतर त्याने मुलाच्या आईला फोन करून घटनेची माहिती दिली. जेव्हा मुलाच्या आईने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, तेव्हा त्याने शपथ घेतली आणि नंतर तिला पटवून देण्यासाठी फोटो आणि व्हिडीओ पाठवले. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Web Title : दिल्ली में दहशत: पिता ने 12 वर्षीय बेटे की हत्या कर वीडियो भेजा

Web Summary : दिल्ली में एक चौंकाने वाली घटना: एक पिता ने अपने 12 वर्षीय सौतेले बेटे की हत्या कर दी, और उसकी आंखें निकालने की कोशिश की। फिर उसने लड़के की मां को सूचित किया, सबूत के तौर पर तस्वीरें और वीडियो भेजे। शिकायत मिलने और जंगल में लड़के का शव मिलने के बाद पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Horror in Delhi: Father Murders 12-Year-Old Son, Sends Video

Web Summary : A shocking incident in Delhi: a father murdered his 12-year-old stepson, attempting to gouge out his eyes. He then informed the boy's mother, sending photos and videos as proof. Police are investigating the horrific crime after receiving a complaint and finding the boy's body in a forest.