शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: जेनीच्या मेसेजला ७२ वर्षांचे आजोबा भूलले, प्लेबॉय व्हायला निघाले, पण अखेर भलतेचं घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 14:19 IST

Crime News: वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय होण्याची हौस एका वृद्धाला चांगलीच महागात पडली आहे. त्यांना प्लेबॉय बनवण्याचं आमिष दाखवून एका जोडप्यानं त्यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले.

वयाच्या ७२ व्या वर्षी प्लेबॉय होण्याची हौस एका वृद्धाला चांगलीच महागात पडली आहे. त्यांना प्लेबॉय बनवण्याचं आमिष दाखवून एका जोडप्यानं त्यांच्याकडून तब्बल ११ लाख रुपये उकळले. या प्रकरणी छत्तीसगडमधील दुर्ग पोलिसांनी कोलकात्यामधील एका प्रेमी जोडप्यासह पाच जणांना अटक केली आहे. ही टोळी लोकांना प्ले बॉय बनवण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत असे. या वृद्धालाही या टोळीने गंडा घातला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. 

गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी या प्रेमी जोडप्यासह पाच जणांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जोडप्याचं सोमवारी लग्न होणार होतं. मात्र लग्नाची बेडी पडण्यापूर्वीच पोलिसांनी त्यांना बेड्या ठोकल्या. दरम्यान, या टोळीने विविध राज्यातील हजाराहून अधिक लोकांना गंडा घातल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

याबाबत पोलिसांनी सांगितलं की, पद्मनाभपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका वृद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्याने सांगितले की, २३ सप्टेंबर २०२२ रोजी मला एक मेसेज आला. हॅलो आय एम जेनी, प्लीज कॉल मी, असा त्यावर उल्लेख होता. त्यानंतर मी त्यावर फोन केला. तेव्हा फोनवर बोलणाऱ्या जोडप्याने मला डेटिंगसाठी मुली पुरवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांच्याकडे नोंदणीसाठी २१४९ रुपये मागण्यात आले. त्यानंतर आयडी बनवण्यासाठी ३९९९ रुपये उकळण्यात आले. मात्र एवढं झाल्यानंतरही माझं कुठल्याही मुलीशी बोलणं करून देण्यात आलं नाही.  जेव्हा मी हे पैसे परत मागितले तेव्हा त्यांनी त्यांना सिल्व्हर कार्ड बनवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर गोल आणि ग्रीन कार्ड बनवण्याचे आमिष दाखवले. असं करून करून त्यांनी या वृद्धाकडून ११ लाख रुपये उकळले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करून फोन लोकेशन ट्रेस केले. तेव्हा हा नंबर कोलकात्यातील असल्याचे समोर आले. पोलिसांनी लगेच लोकेशनच्या मदतीने या जोडप्याला अटक केली. आरोपींची ओळख प्रिया मंडल आणि सौम्य ज्योतिदास अशी पटली आहे. मात्र त्यांनी पोलिसांसमोर वेगळीच कहाणी सांगितली.

या जोडप्यानं सांगितलं की, जेव्हा त्यांनी या वृद्धाला मेसेज पाठवला तेव्हा त्यांना या आजोबांचा फोन आला. या आजोबांनी आपणही प्ले बॉन बनू इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली. आम्हाला वाटले की, या आजोबांकडून पैसे उकळत राहू.  त्यांनी तसंच केलं आणि हे वृद्ध ही एक ना ए दिवस आपण प्ले बॉय बनू या आशेने पैसे देत राहिले. मात्र तसं घडलंच नाही. सध्या पोलीस अटक केलेले आरोपी आणि वृद्धाचीही चौकशी करत आहेत.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅपChhattisgarhछत्तीसगड