शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
4
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
5
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
6
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
7
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
8
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
9
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
10
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
11
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
12
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
13
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
14
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
15
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
16
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
17
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
18
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
19
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
20
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र

Covid-19 Vaccine ची टंचाई होणार दूर; FDA, WHO नं मंजुरी दिलेल्या लसी भारतात येण्याचा मार्ग मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 6:37 PM

Covid 19 Vaccine : FDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीसीठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.

ठळक मुद्देFDA आणि WHO नं मंजुरी दिलेल्या लसीला भारतात आयातीलाठी १-२ दिवसात इम्पोर्ट लायसन्स मिळणार.देशातील लसींची कमतरता दूर होण्यास मिळणार मोठी मदत.

जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम १६ जानेवारीपासून भारतात सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लोकांच्या लसीकरणालाही केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे. परंतु अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचं राज्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे काही राज्यांनी १८ ते ४४ या वयोगटातील लोकांचं लसीकरण तुर्तास थांबवून ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु या परिस्थितीत नीति आयोगाकडून गुरूवारी मोठं वक्तव्य आलं आहे. आता एफडीए आणि डब्ल्यूएचओने मंजूर केलेली कोणतीही लस भारतात आणली जाऊ शकते, असं नीति आयोगाकडून सांगण्यात आलं. तसंच १ ते २ दिवसांच्या आत आयात परवाना दिला जाईल. सध्या कोणताही आयात परवाना प्रलंबित नाही, अशी माहिती नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली. "डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी सोबत अन्य विभाग आणि परराष्ट्र मंत्रालय सातत्यानं फायझर, मॉडर्ना, जॉन्सन अँड जॉन्सनच्या संपर्कात आहे," असं पॉल म्हणाले. ते लसींचे डोस निर्यात करतील का किंवा भारतात त्याचं उत्पादन करतील असं त्यांना विचारण्यात आलं आहे. या तिन्ही कंपमन्या जुले ते सप्टेंबर २०२१ या तिमाहीपर्यंत लस उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.  भारतात लस उत्पादन करण्यासाठी कंपन्या पुढे येतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. याशिवाय कंपन्यांना देशातच भारतीय कंपन्यांसोबत लसीच्या उत्पादनासाठी बोलावण्यात आलं आहे. ऑगस्ट ते डिसेंबर महिन्यापर्यंत भारतात २१६ कोटी डोस उपलब्ध होतील, अशी अपेक्षाही पॉल यांनी व्यक्त केली. पुढील आठवड्यापासून स्पुटनिक उपलब्ध देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला असनाता दुसरीकडे लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानं देशातील आरोग्य क्षेत्रात चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, देशातील सर्व नागरिकांना कोरोनाची लस उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारनं निर्णायक पाऊल उचललं आहे. देशातील कोरोना लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवून सर्वांचे लसीकरण करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. (Overall, 216 crore doses of vaccines will be manufactured in India between August-December - for India and for Indians)रशियाने विकसित केलेली स्पुटनिक ही लस भारतात आली आहे. आता ही लस पुढील आठवड्यापासून बाजारांमध्ये उपलब्ध होईल. रशियातून मर्यादित स्वरूपात आलेला ही लस पुढच्या आठवड्यापासून उपलब्ध होईल, असे डॉ. पॉल यांनी सांगितले. दरम्यान, स्पुटनिक या लसीचे जुलै महिन्यापासून भारतात उत्पादन होईल, अशी माहितीही समोर आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतNIti Ayogनिती आयोग