शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

देश-परदेश : भूकंपाने जपानमध्ये किरकोळ त्सुनामी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

भूकंपाने जपानमध्ये

भूकंपाने जपानमध्ये
किरकोळ त्सुनामी
टोकियो : समुद्रातील भीषण भूकंपामुळे जपानच्या उत्तर भागात सोमवारी किरकोळ त्सुनामी आली. याच भागात २०११ मध्ये त्सुनामीने भयंकर विध्वंस घडवून आणला होता.
पूर्वेकडील इवाते प्रांतात सकाळी २० सेंटीमीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली आहे. जपान हवामानशास्त्र संस्थेने (जेएमए) एक मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविली होती. भूकंपामुळे कुजीत लाटा उसळत आहेत. मात्र, त्यांचा वेग व उंची अधिक वाढण्याची शक्यता नाही.
इवाते प्रांताच्या इतर किनार्‍यांवर १० सेंटिमीटर उंचीच्या लाटांची नोंद झाली. तूर्तास कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. किनार्‍याजवळ सागरी पाणिपातळीमध्ये थोडीही वाढ झाल्याचे दिसत नाही. परिसरातील बंदरातही बदल दिसून आला नाही. सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनी भूकंप झाला. मियाकोपासून २१० कि. मी. पूर्वेकडे प्रशांत महासागरात १० कि. मी. खोलीवर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. २०११च्या भूकंपाने घडवून आणलेल्या भीषण विध्वंसाच्या दृष्टिकोनातून भूशास्त्रज्ञ परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. इवातेतील स्थानिक अधिकार्‍यांनी १९ हजार लोकांना किनारपट्टी भागातून इतरत्र जाण्यास सांगितले आहे. २०११ मधील त्सुनामीने किनारपट्टीवरील ज्या भागात विध्वंस घडवून आणला होता, ज्या भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे निर्देश देण्यात आले त्याच भागात २०११च्या त्सुनामीने १८ हजार लोकांचा बळी घेतला होता.