Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 08:47 IST2025-10-09T08:47:44+5:302025-10-09T08:47:58+5:30

मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप प्यायल्याने किडनी निकामी होऊन झालेल्या २० मुलांच्या मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Cough Syrup Case: Owner of company that made poisonous 'Coldriff' cough syrup arrested! 20 children died after drinking the medicine | Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू

Cough Syrup Case : विषारी 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला अटक! औषध प्यायल्याने २० मुलांचा मृत्यू

मध्य प्रदेशात विषारी कफ सिरप प्यायल्याने किडनी निकामी होऊन झालेल्या २० मुलांच्या मृत्यूंच्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या विशेष तपास पथकाने विषारी कफ सिरप "कोल्ड्रिफ" बनवणारी कंपनी श्रीसन फार्माचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक केली आहे. काल रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रंगनाथनला शोधण्यासाठी २०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

विषारी कफ सिरपचे प्रकरण समोर आल्यापासून रंगनाथन गोविंदन याने चेन्नईतील त्यांच्या घराला आणि तामिळनाडूतील कांचीपुरम येथील त्यांच्या कारखान्याला कुलूप लावले होते. याचबरोबर तो पत्नीसह फरार झाला होता. विषारी कफ सिरप कोल्ड्रिफ प्यायल्याने २० मुलांच्या मृत्यूनंतर, ५ ऑक्टोबर रोजी छिंदवाडा येथील पारसिया पोलिस ठाण्यात औषध कंपनी श्रीसन फार्माचे संचालक, बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी आणि इतर जबाबदार व्यक्तींविरुद्ध बीएनएसच्या कलम १०५, २७६ आणि ड्रग्ज अँड कॉस्मेटिक्स कायदा १९४०च्या कलम २७अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी बालरोगतज्ञ डॉ. प्रवीण सोनी यांना अटक केली होती, परंतु उर्वरित अटक अद्याप प्रलंबित आहेत. छिंदवाडा एसपी अजय पांडे यांनी औषध कंपनीच्या मालकांना अटक करण्यासाठी १२ सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन केले होते.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एसआयटी टीम रंगनाथनला चेन्नईहून भोपाळला आणत आहे, जिथे कफ सिरपचे उत्पादन, कच्च्या मालाचा पुरवठा, वितरण नेटवर्क आणि परवाना यातील अनियमिततेबद्दल चौकशी केली जाईल. सिरपमध्ये हे घातक रसायन कसे समाविष्ट झाले आणि कंपनीच्या गुणवत्ता तपासणी प्रक्रिया इतक्या गंभीरपणे चुकीच्या का होत्या हे शोधण्यासाठी तपास संस्था काम करत आहेत.

मुलांच्या मृत्यूमुळे उडाला गोंधळ!

मध्य प्रदेशात कोल्ड्रिफ नावाच्या कफ सिरपमुळे २० मुलांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात संताप आणि घबराट पसरली. आरोग्य विभागाने तात्काळ या औषधाच्या विक्रीवर बंदी घातली, कंपनीविरुद्ध एफआयआर दाखल केला आणि चौकशी सुरू केली. या घटनेमुळे राज्यातील औषधांच्या सुरक्षिततेच्या मानकांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

रंगनाथनला अशा प्रकारे पकडण्यात आले!

रंगनाथन अटक टाळण्यासाठी अनेक आठवड्यांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्यावर बक्षीस जाहीर केले आणि तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक भागात त्याचा शोध तीव्र केला. या संदर्भात स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने इलेक्ट्रॉनिक पाळत ठेवत आणि स्थानिक स्रोतांचा वापर करून आरोपीचा शोध घेतला आणि त्याला चेन्नईतील एका अपार्टमेंटमध्ये अटक केली.  

Web Title : ज़हरीली कफ सिरप बनाने वाली कंपनी का मालिक गिरफ्तार, 20 बच्चों की मौत

Web Summary : मध्य प्रदेश में 20 बच्चों की मौत के मामले में 'कोल्ड्रिफ' कफ सिरप बनाने वाली कंपनी श्रीसन फार्मा के मालिक को गिरफ्तार किया गया है। रंगनाथन गोविंदन जहरीली सिरप के कारण बच्चों की किडनी खराब होने के बाद से फरार था। पुलिस ने उसकी गिरफ्तारी पर इनाम घोषित किया था।

Web Title : Toxic Cough Syrup Maker Arrested After 20 Child Deaths

Web Summary : The owner of Shreeson Pharma, maker of 'Coldrif' cough syrup, has been arrested in connection with the deaths of 20 children in Madhya Pradesh. Ranganathan Govindan was on the run after the toxic syrup caused kidney failure in the children. Police had announced a reward for his capture.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.